Author Salman Rushdie Health Update: New York मधील हल्ल्यानंतर सलमान रूश्दी व्हेंटिलेटर वर; एक डोळा गमावण्याची शक्यता
Salman Rushdie | PC: Twitter

लेखल सलमान रूश्दी (Salman Rushdie)यांच्यावर काल अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) मध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. एका साहित्यक्षेत्रातील कार्यक्रमात हा हल्ला झाला असून त्यांच्या मानेवर आणि पोटाजवळ हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सलमान जागीच कोसळले. त्यांना तातडीने एअरलिफ्ट करण्यात आले असून त्यांच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर आता ते व्हेंटिलेटर वर आहे. अंतरराष्ट्रीय वृत्त संस्था Reuters च्या माहितीनुसार सलमान यांना एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामध्ये मुलाखतकार देखील जखमी झाला आहे. त्याला सौम्य जखमा झाल्याचं सांगण्यात आले आहे.

दरम्यान सलमान यांच्यावर हल्ला करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी ओळखलं आहे. हल्लेखोर 24 वर्षीय Hadi Matarआहे. तो न्यू जर्सीचा आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. सलमान स्टेजवर येताच त्यांच्या मागून हल्लेखोर देखील सुरक्षा तोडत आला आणि त्याने मागून हल्ला केला. समोर असलेल्या प्रेक्षकांनी तातडीने सतर्कता दाखवल्याने हल्लेखोराला पकडण्यात यश आले आहे.

सलमान रूश्दी हे मूळचे कश्मिरी मुसलमान आहेत. 75 वर्षीय सलमान भारतीय इंग्रजी लेखक आहेत. भारतीय वंशाचे ते ब्रिटिश नागरिक असून मागील 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत होते. सलमान रूश्दी यांना 1988 साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या The Satanic Verses या पुस्तकातील विचारांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून धमक्या आल्या होत्या. यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे मुस्लिम समाजात त्यांच्याबद्दल नाराजी आहे.

सलमान रूश्दी यांना "Midnight's Children" या त्यांच्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यक्षेत्रातला मानाचं Booker Prize देण्यात आलं आहे.