ऑस्ट्रेलियन पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर फेकले अंडे,महिलेला अटक (Watch Video)
Australian PM Scott Morrison (Photo Credits: IANS)

ऑस्ट्रेलियामध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर अंड फेकण्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, स्कॉट यांच्यावर फेकण्यात आलेल्या अंड (Egg) त्यांच्या दिशेने भिरकवण्यात आलं मात्र ते त्यांच्या अंगावर फुटले नाही. सध्या या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी हा 'भ्याड हल्ला' असल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार एका महिलेने केला असून तिला अटक करण्यात आली आहे.

 Scott Morrison यांच्यावर अंड्याचा हल्ल्याचा प्रयत्न 

18 मे दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये निवडणूका होणार आहेत. Women's Association event मध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.