Asia's Richest Person: मुकेश अंबानी यांना मागे टाकत चीनचे उद्योगपती झोंग शानशान बनले एशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
झोंग शानशान आणि मुकेश अंबानी (Photo: Facebook/Wikimedia Commons)

Asia's Richest Person: रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता एशियातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक आहेत. परंतु आता त्यांना सुद्धा मागे टाकत चीनचे उद्योगपती झोंग शानशान  (Zhong Shanshan) हे एशियातील श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शानशान यांची सध्याची नेटवर्थ संपत्ती 77.8 बिलियन डॉलर आहे. ब्लूमबर्ग बिलेयनेयर इंडेक्स यांच्यानुसार जगातिल 11 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. शानशान हे पाण्याच्या बॉटल्स आणि औषध कंपनीच्या उद्योगाशी जोडले गेले आहेत. झोंग शानशान असे एक श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचे मीडियात फार क्वचित त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो.

यंदा कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती ढासळली गेली. तर झोंग शानशान यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल मध्ये त्यांनी बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मेसी एंटरप्राइज (Wantai Biological Pharmacy Enterprise) कंपनी सार्वजनिक केली होती. COVID19 चे संकट आणि लसीच्या दरम्यान Wantai चे शेअर्स फक्त दहा महिन्यातच 2000 टक्क्यांनी अधिक वाढले.(Reliance Jio वरून भारतातील कोणत्याही नेटवर्कवर 1 जानेवारी 2021 पासून voice calls होणार फ्री!)

या वर्षात झाकण बंद पाण्याच्या कंपन्या, नोंगफू स्प्रिंग (Nongfu Spring) हाँगकाँग मध्ये सर्वात लोकप्रिय बनली. नोंगफू च्या शेअर्समध्ये आपल्या स्थापनेनंतर 155 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. तर वेन्टाईने 2 हजार टक्क्यांनी वाढ झाली. याच कारणास्तव त्यांना संपत्तीत सर्वाधिक नफा झाला.

याच दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांना नफा झाला. त्यांची एकूण संपत्ती 76 बिलियन डॉलर झाली आहे. मुकेश अंबानी हे एशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. यामध्ये तिसऱ्या स्थानकावर Pinduoduo चे कोलिन हुआंग (Colin Huang) यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 61.7 बिलियन डॉलर आहे.