Apple Watch Saves Woman Life: Apple ही एक अतिशय लोकप्रिय आणि प्रीमियम स्मार्टफोन कंपनी आहे. या कंपनीचे उत्पादने जगभर आवडतात आणि विकतही घेतली जातात. हे महागडे गॅझेट्स अनेक वैशिष्ट्यांसह येतात. ही वैशिष्ट्य सहसा इतर कोणत्याही कंपनीच्या उपकरणांमध्ये आढळत नाहीत. असेच एक गॅजेट म्हणजे Apple Watch. या गॅझेटच्या मदतीने अनेकांचे प्राण वाचले आहेत. नुकतीच अशीच एक बातमी समोर आली आहे. जेथे एका पतीने रागाच्या भरात पत्नीला जिवंत गाडले आणि मग Apple Watch ने असे काही केले की तुम्हाला विश्वास बसणे कठीण होईल..
डेलीमेलमधील वृत्तानुसार, सिएटलपासून 60 मैलांवर असलेल्या एका शहरात यंग सूक एन या 42 वर्षीय महिलेला तिच्या पतीने रागाच्या भरात जिवंत गाडले होते. या महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार केले आणि नंतर तोंडाला टेप लावून तिला जमिनीत गाडले. अॅपल वॉचच्या मदतीने या महिलेने आपला जीव वाचवला. (हेही वाचा - L'oreal Products: सावधान! लोरिअलचे प्रॉडक्ट्स वापरल्या कर्करोग होण्याची संभावना? न्यायालयात याचिका दाखल)
रिपोर्टनुसार, जेव्हा यंग सूक अनला तिच्या पतीने दफन केले तेव्हा तिने स्वतःला वाचवण्यासाठी तिची ऍपल वॉच वापरली. या महिलेने कस तरी स्वत:ला जमिनीतून बाहेर काढले, त्यानंतर अॅपल वॉचच्या मदतीने त्याने 911 डायल केला आणि स्वतःची सुटका करून घेतली. तिने पोलिसांना पतीच्या कृत्याबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली. पोलिसांनी सांगितले की, महिलेची प्रकृती खूपच वाईट होती. तिचा मान, चेहरा आणि पाय डक्ट टेपने झाकलेले होते आणि तिच्या केसांमध्ये घाण होती. ऍपल वॉचने तिच्या 20 वर्षांच्या मुलीला इमर्जन्सी नोटिफिकेशन देखील पाठवले. परंतु तिच्या पतीला घड्याळाची माहिती मिळाली आणि त्याने ते हातोड्याने तोडून टाकला.
दरम्यान, यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत, जिथे Apple Watch ने जीव वाचवला आहे. काही काळापूर्वी अॅपल वॉचच्या माध्यमातून 12 वर्षांच्या मुलीचा कॅन्सर असल्याची बातमी समोर आली होती.