शिक्षण घोटाळा प्रकरणात अमेरिकेतील दोन अभिनेत्रींचा समावेश
education | (Photo credit: archived, edited, symbolic images)

America’s college admissions scam: अमेरिकेतील सर्वात मोठा शिक्षण घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रकरणात हॉलिवूड सिनेसृष्टीतील फेलिसिटी हफमन (Felicity Huffman) व लोरी लॉफलिन (Lori Loughlin) या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींचे नाव आले आहे. अमेरिकेतील विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेत या अभिनेत्रींनी घोटाळा केल्याचा या दोघींवर आरोप आहे. स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय, जॉर्ज टाउन विश्वविद्यालय, कॅलिफोर्निया विश्वविद्यालय यांसारख्या नामवंत विद्यापिठांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली या दोन अभिनेत्रींनी जगभराती विद्यार्थी आणि पालकांना गंडा घातल्याचे बोलले जात आहे.

फेलिसिटी हफमन व लोरी लॉफलिन यांनी फेटाळले आरोप

या प्रकरणात फेलिसिटी हफमन व लोरी लॉफलिन या दोन अभिनेत्रींसह आणखी 50 जणांवर या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, फेलिसिटी हफमन व लोरी लॉफलिन यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहे प्रकरण?

अमेरिकेतील नामवंत विद्यापिठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जगभरातील विद्यार्थी उत्सुक असतात. परंतू, या विद्यापिठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा अत्यंत कठीण असल्यामुळे गुणवत्ता नसेल तर इथे प्रवेश मिळणे कठीण असते. दुसऱ्या बाजूला जगभरातील श्रीमंत पालकांच्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घ्यायचा असतो. त्यामुळे या परीक्षांना फाटा देऊन किंवा काहीतरी तडजोड करुन विद्यापिठांमध्ये प्रवेश मिळविण्याकडे अशा विद्यार्थी आणि पालकांचा कल असतो. नेमकी हीच बाब हेरून जगभरातील असे हताश आणि गरजू मासे गळाला लावून त्यांच्याकडून प्रवेशाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप होतो आहे. (हेही वाचा, सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार; राज्य सरकारचा निर्णय)

ऑपरेशन वार्सिटी ब्लू 

प्राप्त माहितीनुसार, नामवंत विद्यापिठांच्या प्रवेश प्रक्रियेत घोटाळा होत असल्याचा आरोप होण्याचे प्रमाण गेल्या काही काळात वाढले होते. त्यामुळे अमेरिकेतील एफबीआय या संस्थेने या आरोपांतील तथ्याचा शोध घेण्याचे ठरवले. प्राप्त माहितीनुसार एफबीआयच्या टीमने शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेस ऑपरेशन वार्सिटी ब्लू असे नाव दिले. या मोहीमेखाली एफबीआयच्या पथकाने अनेक विद्यार्थ्यांची चौकशी केली असता या दोन अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत.