Adult Film Star Dahlia Sky Passes Away: अमेरिकी पॉर्नस्टार डाहलिया स्काई हिची आत्महत्या, जाणून घ्या कारण
Adult Film Star Dahlia Sky | (Photo Credits: Twitter)

अमेरिकी पॉर्न इंडस्ट्री (Porn Industry) विश्वात अनेक तरुण तरुणी कार्यरत असतात. काही लोक याच्याकडे करीअर म्हणून पाहतात काही मंडळी पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून. पण अल्पावधीतच या मंडळींचा भ्रमनिरास होतो. ज्यामळे या लोकांना पुढे नैराश्य अथवा एकटेपणा जाणवू लागतो. तसेच, हे क्षेत्र किती भयावह आणि तितकेच क्रूर आहे याचीही जाणीव होते. अमेरिकी पॉर्न इंडस्टी (American porn industry) मध्ये एकेकाळी कार्यरत असलेल्या अशाच एका पॉर्नस्टारने आत्महत्या केली आहे. डाहलिया स्काई (Dahila Sky) असे या पॉर्नस्टारचे नाव आहे. पॉर्नस्टार डाहलिया स्काई (Dahila Sky) हिने स्वत:वर बंदीकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.

डाहलिया स्काई (Dahila Sky) ही आपल्या कारमध्येच राहात असे. 30 जून रोजी तिचा मृतदेह कारमध्ये आढळला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, डाहलिया हिचा मृत्यू बंदुकीतील गोळी लागून झाला आहे. रिपोर्टनुसार डाहलिया स्काई हिचा पुढच्या महिन्यात 32 वा वाढदिवस होता. तिला स्तनांचा कर्करोग होता. तिला डिप्रेशनचाही आजार होता. त्यातून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डाहलिया स्काई (Dahila Sky) हिचा मृतदेह कारमध्ये आढळला. तिने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणास्थव केली? तिच्या मृत्यूस आणखी कोणी जबाबदार आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा, पॉर्न साइट XTube येत्या 5 सप्टेंबरपासून कायमस्वरूपी होणार बंद)

ट्विट

डाहलिया स्काई (Dahila Sky) हिने 2010 मध्ये अॅडल्ट इंडस्ट्री (अश्लिल उद्योगविश्व) मध्ये प्रवेश केला. सुरुवातीला तिने बेली ब्लू नावाने करीअरला सुरुवात केली. तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये अनेक व्हिडिओ बनवले. त्यातील अनेक व्हिडिओ, चित्रपटांना पुरस्कारही मिळाले होते. दरम्यान तिचा स्तनांंचा कर्करोक चौथ्या स्तरावर पोहोचला. त्यातून आपल्याला डिप्रेशन आल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहते आणि हितचिंतकांना सांगितले होते.