पॉर्न साइट XTube येत्या 5 सप्टेंबरपासून कायमस्वरूपी होणार बंद
XTube ( File Image )

XTube माइंडगीक (MindGeek) यांच्या मालकीची पोर्न साइट आता 5 सप्टेंबरपासून कायमस्वरूपी बंद होणार आहे. पोर्नहब नेटवर्कचा भाग असलेली एक्सट्यूब बंद होण्याबद्दल कोणतेही निश्चित विधान करण्यात आलेले नाही. परंतु या संदर्भात काही गोष्टी समोर आल्या आहेत. माइंडजीक वादग्रस्तपणे जगातील सर्वात मोठा पोर्नोग्राफी व्यवसाय बनला आहे. त्यात पोर्नहब (Pornhub), रेडट्यूब (RedTube) आणि युपॉर्न (YouPorn ) यासारख्या अडल्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि ब्राझर्स डिजिटल (Brazzers Digital) प्लेग्राऊंड आणि रियालिटी किंग्ज (Reality Kings) यासारख्या निर्मिती कंपन्या आहेत. (Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या)

गेल्या कित्येक वर्षांपासून, माइंडगीक अनेक खटल्यांमध्ये अडकले आहेत. यापैकी मोठ्या संख्येने माइंडगीकच्या साइटवर अवैध गोष्टी पोस्ट करण्यात आल्या आहेत. यात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार आणि सूडासह अश्लील गोष्टींचा समावेश आहे परंतु हे एवढेच मर्यादित नाही. यामधील नवीन प्रकरण याच वर्षातील जून महिन्याचे आहे. पण या प्रकरणातील खटला होणे खुप दूरची गोष्ट आहे.अशा प्रकारच्या संभाव्य कायदेशीर कारवाईमुळे पोर्नोग्राफी साइट बंद होत आहे या निष्कर्षावर न येता XTube बंद केल्याचा विचार करणे अशक्य आहे.  XTube  याबद्दल काहीच प्रतिक्रिया देत नाही हे विशेष आहे.

तस्करी विरोधी आणि लैंगिक कार्यकर्ता लैला मिकेलवेट यांनी या ट्विटद्वारे आधीच सतर्क केले होते. त्यांनी विधानात असे म्हटले की, XTube  का बंद होत आहे याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही. एक्स ट्यूबच्या साइटवर देखील याबद्दल काही लिहिले गेले नाही आणि त्यांच्या ब्लॉग वर ही अद्याप कोणतीही घोषणा नाही. ट्विटरदेखील या विषयावर कोणीच काही लिहिले नाही.