Virus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

America: अमेरिकेत कोरोना हा आजार डोकेवर काढतांना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस चा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोन व्हायरसचे गेल्या आठवडाभरात 1,092 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे, जी सप्टेंबरनंतरची सर्वाधिक नोंद नोंदवली गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात 1,76,857 नवे रुग्ण आढळले आहेत.  2020 मध्ये चीनमधून या व्हायरसचा प्रसार झाला होता. ज्यामुळे या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. दरम्यान, अमेरिकेत पुन्हा एकदा  कोरोना व्हायरसचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा: New Hajj 2025 Rules: सौदी अरेबियाने जारी केले 'हज 2025'साठी नवीन नियम; लहान मुलांना परवानगी नाही, प्रथमच यात्रा करणाऱ्यांना प्राधान्य

येथे पाहा, अमेरिकेतील रुग्ण संख्या 

अमेरिकेतील रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 2 टक्क्यांनी वाढून 12,380 वर पोहोचली आहे. संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने आरोग्य तज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि लस घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, रुग्णालयात दाखल रुग्णांची एकूण संख्या १० हजार ३५३ इतकी असून, त्यात दोन टक्क्यांची घट दिसून येत आहे. दरम्यान, आयसीयूमध्ये दाखल रुग्णांची संख्या 1,542 झाली असून, यात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.