2000 वर्ष जुन्या श्रीकृष्णाच्या मूर्ती इंग्लंड कडून भारताकडे सुपूर्त, ध्वजारोहण सोहळ्यात उच्च आयुक्त रुची घनश्याम यांनी घेतला ताबा
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

भारतीय मूळ असलेल्या दोन प्राचीन मूर्तींचा शोध अमेरिका- ब्रिटनच्या (UK-US) संयुक्त सर्च टीमने लावून या मूर्ती भारताकडे परत केल्या आहेत. त्यामुळे निश्चितच यंदाचा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थाने खास ठरला. लंडन (London) मधील गांधी हॉल ऑफ इंडिया हाऊस (Gandhi Hall Of India House) मध्ये काल म्हणजेच 15 ऑगस्ट ला झेंडावंदन व कार्यक्रमासह भारताचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात आला. या सोहळ्यात भारताच्या उच्च आयुक्त रुची घनश्याम (Ruchi Ghanshyam)  यांच्याकडे या दोन्ही मूर्ती सुपूर्त करण्यात आल्या.

प्राप्त माहितीनुसार यातील एक मूर्ती ही आंध्रप्रदेश मधील तर दुसरी मूर्ती तामिळनाडू मधील आहे. आंध्रप्रदेश येथील मूर्ती ही जवळपास एक शतक जुनी असून तिची रचना चुनखडीच्या करण्यात आली आहे तर नवनीत कृष्ण ही दुसरी मूर्ती कांस्याने बनली असून ती सतराव्या शतकातील असल्याचे समजत आहे. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव)

यासंदर्भात रुची घनश्याम यांनी या मूर्ती म्हणजे भारतीय इतिहासाची साक्ष आहेत, त्यामुळे यांची किंमत करणेही शक्य नाही अशी प्रतिक्रिया दिली. यासोबतच या अमौलिक मूर्ती म्हणजे भारत- अमेरिका- ब्रिटन या देशातील मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रतीक असल्याचे सुद्धा त्या म्हणाल्या. यापूर्वी या मूर्तींच्या तस्करीचा संबंध सुभाष कपूर नामक एका व्यक्तीशी जोडण्यात येत होता, मात्र या मूर्तींचे अवशेष लंडन मधील एका व्यक्तीकडे आढळले.

दरम्यान, या शोध मोहिमेत स्कॉटलँडच्या अधिकाऱ्यांसमवेत होमलँड सेक्युरिटी इन्वेस्टीगेशन अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. एचआयसी न्यूयॉर्कच्या एजंटनी सांगितल्यानुसार, या सर्व पुरातन गोष्टी एखाद्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे त्यांना आर्थिक मूल्यांमध्ये बसवणे उचित नाही, तसेच या इतिहासाच्या तुकड्यांच्या औराव्यानुसार त्यांना त्यांच्या मायदेशी परत जाण्याचा मान देणे आवश्यक आहे.