रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे सर्वात मोठे तरुण विरोधक आणि टीकाकार अलेक्सी नवलनी (Alexei Navalny ) यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु असताना आता त्यांच्या विधवा पत्नी युलिया नवलनाया (Yulia Navalnaya) यांनाही त्रास देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. युलीया यांचे X प्लॅटफॉर्मवरील सोशल मीडिया खाते काही काळासाठी निलंबीत करण्यात आले. त्यानंतर काही वेळानंतर ते पुन्हा सुरु करुन पूर्ववत झाले खरे. मात्र, त्यामुळे जगभरातील प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. श्रीमती नवलनाया यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. पतीने सुरु केलाला लढा त्या पुढे नेत असून युरोपियन युनियन (EU) ला मार्चमध्ये रशियाची आगामी अध्यक्षीय निवडणूक नाकारण्याची विनंती केली आहे.
एक्स खाते निलंबीत होण्याचे कारण अस्पष्ट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर युलिया नवलनाया यांच्या खाते निलंबनाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या X खात्याच्या निलंबनाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. रशियाच्या मार्चमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीला मान्यता नाकारण्यासाठी नवलनायाने EU ला केलेली मागणी पुतीनच्या राजवटीला तिचा वाढता विरोध दर्शवितो. त्यांनी आपले पती अलेक्सी नवलानी यांच्या मृत्यूस व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. (हेही वाचा, Alexei Navalny: ॲलेक्सी नवलनी यांच्या समर्थक गटाकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी; मृतदेह अद्यापही गायब)
पुतीन विरोधातील लढा तीव्र करण्याचे अवाहन
नवलनाया यांनी देशाबाहेरुन प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये संदेशात जनतेला पुतीन यांच्या विरोधातील लढा तीव्र करण्याचे अवाहन केले आहे. तसेच रशियन सरकारला "गणवेशातील डाकू, चोर आणि खुनी" म्हणूनही संबोधले आहे. तिने नवलनीच्या मृत्यूशी संबंधित पुरावे जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पतीच्या मृत्यूस क्रेमलिनच जबाबदार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Vladimir Putin यांचे टीकाकार Alexei Navalny यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर Alexander Murakhovsky बेपत्ता)
रशियातील निवडणुकांना मान्यता नाकारण्याची विनंती
ब्रुसेल्समधील EU परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान नवलनाया यांनी अवाहन केले होते की, त्यांच्या पतीच्या मृत्यूला पुतीन हेच जबाबदार आहेत. त्यामुळे पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये मार्च महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीस मान्यता नाकारण्यात यावी. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासह पाश्चात्य नेत्यांनी नवलनीच्या मृत्यूबद्दल पुतीनचा निषेध केला आहे, तर क्रेमलिनने त्यांचा या मृत्यूमध्ये त्यांचा सहभाग नाकारला आणि तपास चालू असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, नवलानी यांच्या मृत्यूची जगभरातून दखल घेतली जात आहे. या मृत्यूबद्दल जगभरातून तीव्र चिंता आणि टीका होत आहे. खास करुन अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या नेतृत्वाखाली पाश्चात्य नेत्यांकडून तीव्र टीका होत आहे. या सर्वांनी नवलानी यांच्या धैर्याला आदरांजली वाहिली. तसेच,या मृत्यूला राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला. इंग्लंडने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या मृत्यूचे रशियावर दूरगामी परिणाम होतील. नवलनी यांच्या मृत्यूबद्दल बोलताना, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे "ठग" म्हटले आणि त्यांना "रशियन राज्याचे कायदेशीर प्रमुख" म्हणून समजणे "मूर्खपणाचे" असल्याचे सांगितले. रशियातील या नव्या गूढ मृत्यूमुळे या देशातील सामान्य नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.