Myanmar Air Strike (Image Credit - ANI Twitter)

म्यानमार लष्कराने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक मुले आणि पत्रकारांसह किमान 100 लोक मारले गेले आहेत. म्यानमारच्या सत्ताधारी जंटाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे,  लष्कराने बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पाजीगी भागात हा हल्ला केला. हा भाग सागेंग प्रांतात आहे. हल्ल्यावेळी काही नागरिक एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. म्यानमारच्या तख्तापालटानंतर हा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर केलेला मोठा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनूसार गावात एक लष्कराचे जेट विमान आले आणि त्याने गावावर बॉम्ब डागले तसेच गोळीबारही केला. स्वताच्या देशातील लोकांवर असे हल्ले केल्याच्या विरोधात जगभरातून म्यानमारमधील सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 8 वाजता एका लढाऊ विमानाने सुमारे 150 लोकांच्या जमावावर बॉम्ब टाकले. मृतांमध्ये महिला आणि 20 ते 30 मुलांचा समावेश होता, असे ते म्हणाले, मारले गेलेल्यांमध्ये स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या सरकारविरोधी सशस्त्र गट आणि इतर विरोधी संघटनांच्या नेत्यांचाही समावेश होता.

एका माहितीनुसार म्यानमार आपल्याच नागरिकांना ठार मारण्यासाठी वेगाने शस्त्रसाठा वाढवत आहे. निर्बंधांमुळे म्यानमार इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे तो स्वतःची शस्त्रे बनवत आहे. भारत, अमेरिका व जपानसह 13 देशांतील कंपन्या याकामी म्यानमारला मदत करत आहेत. म्यानमार हल्ल्यांसाठी चिनी व रशियन बनावटीची शस्त्रे वापरत असल्याचा दावा केला आहे.