Aircraft Crashes at Pokhara International Airport: पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 68 प्रवाशांसह विमान कोसळले
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळमधून धक्कादायक वृत्त येत आहे. नेपाळमधील (Nepal) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pokhara International Airport in Nepal) एक विमान धावपट्टीवरच कोसळले. हा अपघात (Plane Crash) घडला त्या वेळी विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, अशी माहिती यती एअरलाइन्सचे (Yeti Airlines) प्रवक्ते सुदर्शन बारटौला यांनी दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

सुरुवातीला हाती आलेल्या माहितीनुसार विमान अपघाता वेळी विमानात 72 प्रवासी असल्याचे सांगितले जात होते. मात्र नंतर विमानात 68 प्रवासी असल्याचा खुलासा झाला. मात्र, चार क्रू मेंबर्ससह हा आकडा 72 इतकाच होतो. अपघाताच्या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. अपघातानंतर विमानतळ सर्व प्रकारच्या विमानोड्डाण आणि लँडींगसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

ट्विट

यती एअरलाईन्स ही नेपाळमधील सर्वात जुनी विमान कंपनी असल्याचे सांगितले जाते. याच कंपनीच्या विमालाला दुर्घटना घडली आहे. विमानाला आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते. विमानातील जखमी प्रवाशांची माहिती समजू शकली नाही. मात्र, विमान अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवत हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.