Earthquake | File Image

Tonga Island Earthquake: म्यानमार आणि थायलंडनंतर आता आणखी एका पॅसिफिक बेट देशाला मोठा भूकंप (Earthquake) झाला आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 पेक्षा जास्त असल्याचेही सांगितले जाते. एपी वृत्तानुसार, हा भूकंप टोंगाजवळ (Tonga Island) झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 इतकी नोंदवली गेली. इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्रतीक्षेत आहे.

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप टोंगाजवळ झाला. त्याची तीव्रता 7.1 आहे. यामुळे पॅसिफिक बेट देशासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने सांगितले की, सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार मुख्य बेटापासून सुमारे 100 किलोमीटर (62 मैल) ईशान्येस भूकंप झाला. (हेही वाचा -Earthquake In Myanmar-Thailand: म्यानमार-थायलंडमध्ये भूंकप! पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांना दिला मदतीचा हात)

त्सुनामीचा इशारा -

या विनाशकारी भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या किनाऱ्यांवर धोकादायक लाटा उसळू शकतात. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल तात्काळ कोणतेही वृत्त मिळालेले नाही. टोंगा हा पॉलिनेशियामधील एक देश आहे जो 171 बेटांनी बनलेला आहे आणि त्याची लोकसंख्या 1 लाखापेक्षा थोडी जास्त आहे, त्यापैकी बहुतेक लोक टोंगाटापू या मुख्य बेटावर राहतात.