
दहशतवादी मुद्द्यावर आता पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी झाली आहे. तर भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर दिले आहे. तर आता ईराणने (Iran) ही पाकिस्तानला त्यांचा देशात स्थित असलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. पुलवामा भ्याड हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध आवाज उठवला. त्याचसोबत त्यांच्या देशात घुसुन हल्ला करण्याची ताकद दाखवून दिली. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे. याच स्थित आता ईराणसुद्धा पाकिस्तानला खरे-खोटे बोल सुनावत आहे. आईआरजीसी (IRGC) कुर्द सेना प्रमुख जनरल कासिम सोलेमानी (Qassem Soleimani) यांनी पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या सैन्याला कडक इशारा दिला आहे.
जनरल सोलेमानी यांनी असे म्हटले आहे की, तुमच्याकडे परमाणू बॉम्ब तर आहेत. मात्र तुमच्याकडील दहशतवादाला तुम्ही मिटवू शकत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने ईराणच्या संकल्पाची वाट पाहू नये. त्याचसोबत पाकिस्तान सरकारला तुम्ही कोणत्या दिशेला जातायत असा सवाल केला आहे. तुमच्या बाजूच्या देशांच्या सीमेवर अशांती निर्माण करुन ठेवली असल्याचा संताप सोलेमानी यांनी व्यक्त केला आहे.
ईराणने असे म्हटले आहे की, पाकिस्तान हा खुद्द दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे जर पाकिस्तानने या दहशतवाद्यांचा खात्मा केला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल.
गेल्या 13 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने बलूचिस्तान सीमा येथे एक आत्मघाती हल्ला केला. त्यावेळी रेव्हॉल्युशनरी गार्ड मधील 27 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षात भारत आणि ईराण पाकिस्तान विरुद्ध दहशतवादामुळे आवाज उठवत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना पाकिस्तानातील दहशतवाद्यांपासून आपल्या देशातील सीमेवर शांतता हवी आहे.