Protest (Photo Credits-Twitter)

अफगाणिस्तान (Afghanistan)  मध्ये तालिबान्यांनी (Taliban)  त्यांची सत्ता स्थापन केली आहे. याच सोबत आता अफगाणिस्तानमध्ये विरोधी प्रदर्शने सुद्धा वेग धरु लागले आहेत. काबुल ते हेरत पर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरुन तालिबान सरकार आणि पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सातत्याने होत असलेल्या अशा आंदोलनामुळे आता तालिबानने आंदोलकांसाठी काही निर्बंध लागू केले आहेत.(Afghanistan-Taliban Conflict: अफगाणी महिलांना खेळ खेळण्याची परवानगी नाही, तालिबानने लादले निर्बंध)

नव्या अंतरिम सरकारने घोषणा करणाऱ्या तालिबानने असे म्हटले की, आता लोकांना कोणत्याही प्रकारचे विरोधी प्रदर्शन करायचे असेल तर त्यांना न्याय मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचसोबत आंदोलनकर्त्यांना त्यामागील उद्देश, घोषणाबाजी, ठिकाण, वेळ आणि विरोधी प्रदर्शनासंबंधित संपूर्ण माहिती सुरक्षा एजंसीला सुद्धा द्यावी लागणार आहे.

त्याचसोबत तालिबान सरकारने नवा फतवा काढला आहे की, कोणत्याही आंदोलनाच्या 24 तास आधी आंदोलनकर्त्यांना सुरक्षा यंत्रणाला याबद्दल माहिती द्यावी. आदेशात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही केली जाणार आहे. तर अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशावर तालिबानचा ताबा आणि काही मुद्यांवरुन पाकिस्तानच्या हस्तक्षेपाच्या विरोधात बुधवारी काबुल मध्ये जोरदार आंदोलन केले.(Afghanistan-Taliban Conflict: तालिबान्याच्या वर्चस्वानंतर अफगाण नागरिकांवर आलीये घरातील वस्तू विकण्याची वेळ)

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तान मध्ये नव्या सरकारची घोषणा केली आहे. मुल्ला मुहम्मद अखुंदला अफगाणिस्तानचे पंतप्रधान पद देऊ करण्यात आले आहे. त्याचसोबत मुल्ला बरादर आणि अब्दुल सलाम हनीफ यांना उपपंतप्रधान पद दिले आहे. सिराजुद्दीन हक्कानी याला देशाचा गृहमंत्री आणि मुल्ला उमर याचा मुलगा मुहम्मद याकूब याला संरक्षण मंत्री बनवले आहे. नव्या सरकारने कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला त्यामध्ये स्थान दिलेले नाही. यापूर्वी अशी चर्चा सुरु होती की, अफगाणिस्तानने माजी राष्ट्रपती हामिद करजई आणि सीईओ अब्दुल्ला अब्दुल्ला यांना सत्तेत स्थान मिळू शकते. या व्यतिरिक्त नव्या सरकारमध्ये एका महिलेला सुद्धा जागा देण्यात आलेली नाही.