प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

अफगाणिस्तान (Afghanistan) येथील कंधार (Kandahar) मध्ये बुधवारी (31 जुलै) सकाळी मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची घडना घडली आहे. या हल्ल्यात महिला आणि बालकांसह 34 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपाचारासाठी दााखल करण्यात आले आहे. परंतु दहशतवादी हल्ला का करण्यात आला यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेरात-कंधार राजमार्गावर आज सकाळी रस्त्याच्या कडेला एक बॉम्ब स्फोट झाला. यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या महिला आणि बालकांचा आकडा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. तर तीन दिवसांपूर्वीसुद्धा कंधार येथील एका गजबजलेल्या बाजारात आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी तीन मुलांसह 23 जणांचा मृत्यू झाला होता.(Pakistan train crash: पाकिस्तानात रेल्वेची समोरासमोर धडक; 11 ठार, 60 गंभीर जखमी)

त्यानंतर आता पुन्हा अफगाणिस्तान येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. तर गुरुवारी सुद्धा तीनवेळा हल्ला करण्यात आल्याने त्यावेळी 10 जणांसह पाच महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज झालेल्या हल्ल्याबाबत तालिबान यांनी जबाबदारी स्विकारली असल्याचे म्हटले जात आहे.