Moss Landing Power Plant Fire (फोटो सौजन्य -X/@rawsalerts)

Moss Landing Power Plant Fire: गुरुवारी दुपारी जगातील सर्वात मोठ्या बॅटरी स्टोरेज प्लांटपैकी (Battery Storage Plant) एक असलेल्या कॅलिफोर्नियातील बॅटरी स्टोरेज प्लांटमध्ये भीषण आग (Fire) लागली. त्यामुळे शेकडो लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगीमुळे उत्तर कॅलिफोर्नियातील हायवे 1 चा काही भाग बंद करण्यात आला आहे. मर्क्युरी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आगीनंतर परिसरात ज्वाला आणि काळा धूर दिसत होता.

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, आग दुपारी 3 वाजता (कॅलिफोर्निया स्थानिक वेळेनुसार) लागली. माहिती मिळाल्यानंतर, मोंटेरी काउंटीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीमुळे मॉस लँडिंग आणि एल्कहॉर्न स्लो परिसरातील सुमारे 1500 लोकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस सुमारे 124 किलोमीटर अंतरावर असलेला मॉस लँडिंग पॉवर प्लांट टेक्सास कंपनी व्हिस्ट्रा एनर्जीच्या मालकीचा आहे. त्यात हजारो लिथियम बॅटरी आहेत. (हेही वाचा -Los Angeles Fire: लॉस एंजेलिसमध्ये आगीचा कहर; आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता)

मॉस लँडिंग पॉवर प्लांटला आग, पहा व्हिडिओ - 

सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांमधून वीज साठवण्यासाठी लिथियम बॅटरी महत्त्वाच्या असतात, परंतु जर त्यांना आग लागली तर ही आग विझवणे खूप कठीण होऊ शकते. ही एक आपत्ती आहे, असं मोंटेरी काउंटी सुपरवायझर ग्लेन चर्च यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.