Jail Pixabay

Pakistan Shocker: पाकिस्तान(Pakistan)मधील चारसड्डा शहरात एका 12 वर्षांच्या मुलीचे (Minor Girl)72 वर्षीय वृद्धासोबत लग्नाचा घाट पोलिसांनी उधळला. या प्रकरणी पोलिसंनी 72 वर्षीय वृद्धाला अटक(Groom Arrested) केली आहे. तर आरोपी वडिल सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील आलम सय्यद यांनी तिला 5,00,000 रुपयांना वृद्धाला विकण्याचे मान्य केले. 'निकाह'च्या काही वेळपूर्वी, पोलिसांनी हस्तक्षेप करून हबीब खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 72 वर्षीय वराला आणि 'निका ख्वान' (लग्नाची शपथ घेणारी व्यक्ती) अटक केली. मात्र, मुलीचे वडील घटनास्थळावरून फरार होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही.

अल्पवयीन मुलीचे वडील, 72 वर्षीय पुरुष आणि बालविवाह कायद्यांतर्गत 'निकाह ख्वान' विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एआरवाय न्यूजने म्हटले आहे. बालविवाहाविरोधातील कायदे असूनही पाकिस्तानमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे.

अलीकडेच, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी राजनपूर आणि थट्टा येथे असेच प्रयत्न हाणून पाडले, जेथे तरुण मुलींना मोठ्या वृद्धालाशी लग्न करण्यास भाग पाडले जात होते. एका प्रकरणात, पंजाबमधील राजनपूरमधील एका 11 वर्षांच्या मुलीचे एका 40 वर्षीय पुरुषाशी लग्न करायचे होते, असे एआरआय न्यूजनुसार. थट्टा येथे एका अल्पवयीन मुलीचे 50 वर्षीय जमीनदाराशी जबरदस्तीने लग्न लावण्यात येत होते, मात्र सुदैवाने पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे लग्न होऊ शकले नाही. 6 मे रोजी, स्वातमध्ये 13 वर्षीय मुलीशी लग्न केल्याप्रकरणी पोलिसांनी 70 वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वराला आणि वडिलांना ताब्यात घेतले.