Representational image. (Photo Credits: Pexels)

अमेरिकेच्या साऊथ डकोटा (South Dakota in United States) येथे शनिवारी रात्री एका प्रवासी विमानाला भीषण अपघात (Plane Crash) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून 12 लोक प्रवास करीत होते. हे विमान चेंबरलेन येथून उड्डाण करुन इदाहो फॉल्सकडे निघाले होते.

ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणापूर्वी चेंबरलेन आणि सेन्ट्रल साऊथ डकोटामध्ये बर्फाच्या वादळाचा इशारा देण्यात आला होता. (हेही वाचा - 5.500 फुट उंचीवर चक्क झोपी गेला वैमानिक; 40 मिनिटे तसेच हवेत उडत राहिले विमान)

या अपघातातील मृतांमध्ये 2 मुलांचादेखील समावेश आहे. तसेच जखमी झालेल्या तिघांना सियोक्स फॉल्स येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अद्याप विमान अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये अशा स्वरुपाचा विमान अपघात झाला होता. या अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाला होता.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जकार्ताहून पान्गकल पिनांगला निघालेले विमान उड्डाणानंतर अवघ्या 13 मिनिटांमध्ये कोसळले होते. हे विमान लायन एअरवेजचे होते. सुरूवातीला या विमानाचा संपर्क तुटला होता. मात्र अखेर 'रॉयटर्स'वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शोध पथकाने हे विमान कोसळले असल्याचे सांगितले होते. विमानाचे काही अवशेष समुद्रामध्ये सापडले होतो. या विमानात 188 प्रवासी होते.