बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Baghdad International Airport) आज रॉकेट हल्ला (Rocket Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं तेथील सुरक्षा अधिकाऱ्याने सांगतिलं आहे.
बगदाद विमानतळावर आज 3 रॉकेटचा हल्ला करण्यात आला. त्यामुळे येथील वाहनांना आग लागली. यामध्ये काही टॉप कमांडरचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात इराण टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर टाळा, अमेरिकेचा आपल्या विमान कंपन्यांना इशारा; सांगितले हे कारण)
Iran's Quds Force chief Qassim Soleimani among 7 killed in US airstrike at Baghdad airport
Read @ANI Story | https://t.co/Al3P48s5Ni pic.twitter.com/QXWAgj8uIy
— ANI Digital (@ani_digital) January 3, 2020
Eight killed in rocket attack on Baghdad airport in Iraq according to security sources: AFP news agency
— ANI (@ANI) January 3, 2020
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून हल्ला करण्यात आला होता. अमेरिका-इराकमध्ये तणाव निर्माण झाल्याने हा हल्ला करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या हल्यासाठी इराणला जबाबदार ठरवले होते. त्यामुळे अमेरिकेने या हल्ल्याच्या माध्यमातून इराकला प्रतिउत्तर दिले आहे.