देवाचा आदेश सांगून 8 महिलांवर बलात्कार, पादरीला अटक
फोटो सौजन्य - फाइल फोटो

दक्षिण कोरायामध्ये एका पादरीने देवाचा आदेश आहे असे सांगून आठ महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पादरीला 15 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी ली- जे रॉक असे या पादरीचे नाव आहे. सन 1982 मध्ये 12 अनुयायांसोबत त्याने चर्चची स्थापना केली होती. या चर्चच्या देशभरात 10 हजार संस्था आहेत. तर दक्षिण कोरियातील मेगाचर्च येथे या आरोपी पादरीने 8 महिलांचे लैंगिक शोषण केले. या मेगाचर्चला कोणत्याही ईसाई संस्थानकडून मान्यता देण्यात आली नाही. तसेच या पादरीने चर्चमध्ये येणाऱ्या महिलांना माझ्याजवळ दैवी शक्ती असल्याचे सांगितले होते. या युक्तिवादाच्या सहाय्याने या पादरीने महिलांचे लैंगिक शोषण केले.

तर पादरीने दैवी शक्ती असल्याचे नाटक करुन महिलांना स्वर्ग प्राप्त होईल असे सांगितले होते. मात्र काही महिलांनी या पादरी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यावेळी पादरीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.