Egyptian Church Fire: इजिप्तमधील चर्चला लागलेल्या भीषण आगीत 41 जण ठार; अनेक जखमी, अपघातादरम्यान चेंगराचेंगरी
Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

Egyptian Church Fire: इजिप्तच्या गिझा शहरातील एका चर्चला रविवारी भीषण आग लागली. यात 41 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इम्बाबा भागातील अबू सिफिन चर्चमध्ये 5,000 लोक जमले होते. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्यानंतर चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाली.

इजिप्तच्या कॉप्टिक चर्चने शेअर केलेल्या माहितीचा हवाला देत वृत्तसंस्था एपीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रविवारी काहिरा येथील चर्चमध्ये आग लागल्याने किमान 41 लोक ठार झाले आणि 14 जण जखमी झाले. आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, आगीची सुरुवात दाट लोकवस्ती असलेल्या इम्बाबा, अबू सेफीन चर्च परिसरात झाली. आगीच्या कारणाबाबत अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. (हेही वाचा - Salman Rushdie Health Update: सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटर हटवला; हल्लेखोर Hadi Matar ला पश्चाताप नाही)

मात्र, शॉर्टसर्किटमुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कॉप्टिक ख्रिश्चन पोप तावाड्रोस-II यांच्याशी फोनवर बोलून मृतांप्रती शोक व्यक्त केला, असे राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रविवारी सकाळी सेवा सुरू असताना आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

त्याचवेळी, वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आगीमुळे चर्चचे प्रवेशद्वार बंद झाले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आहेत. गिझा हे इजिप्तमधील दुसरे सर्वात मोठे शहर असून ते काहिरापासून नाईल नदीच्या पलीकडे आहे.