
Mexico Metro Accident: मेक्सिको सिटीमधील भूमिगत पुलावरून जाणाऱ्या ट्रेनवर पुलाचा काही भाग खाली पडल्याने कमीतकमी 23 लोकांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले. ही माहिती अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळाली आहे. मंगळवारी स्थानिक टीव्ही स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत मेक्सिकोच्या सिटी महापौर क्लाउडिया शिनबाम यांनी सांगितले की, मेट्रो ट्रेन जात असताना कॉंक्रिट बीम तिच्यावर पडल्याने सोमवारी रात्री हा अपघात झाला.
क्लाउडिया शिनबाम यांनी पुढे सांगितलं की, "अपघाताचे कारण शोधण्यासाठी संबंधित घटनेची चौकशी केली जाईल. जे काही घडले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत." डीपीए न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 12 व्या मार्गावर मेट्रो ट्रेनची जोरदार टक्कर झाली. (वाचा - आश्चर्यकारक! महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म; जाणून घ्या कोठे घडली 'ही' अनोखी घटना)
फुटेजमध्ये बचावकर्त्यांनी पुलावरून लटकलेल्या प्रवाशांना रेल्वे गाड्यांमधून खेचण्यासाठी शिडीचा वापर केल्याचं दिसून येत आहे. रेल्वेच्या अस्थिर अवस्थेमुळे बचावकार्य तहकूब करावे लागले. 12 वर्षांपूर्वी मेट्रो मार्गावरील खांब पाडल्याची रहिवाशांनी तक्रार केली होती. त्यानंतर लाईन बांधकामात भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते. 2014 मध्ये लाइन 12 चे उद्घाटन झाल्यानंतर दुरुस्तीमुळे बराच काळ सेवा विस्कळीत होती.