Japanese Navy Choppers Crash: जपानी नौदलाचे 2 हेलिकॉप्टर पॅसिफिक महासागरात कोसळले; हेलिकॉप्टरमध्ये 8 जणांचा समावेश
Helicopter Crash प्रतिकात्मक प्रतिमा (PC- pixabay)

Japanese Navy Choppers Crash: जपानमध्ये प्रशिक्षणादरम्यान नौदलाचे दोन हेलिकॉप्टर प्रशांत महासागरात कोसळले. या घटनेची माहिती देताना जपानचे संरक्षण मंत्री मिनोरू किहारा यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा तेरिशिमा बेटाजवळ दोन एसएस-60 हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. आठ कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, अधिकारी अजून सात जणांचा शोध घेत आहेत.

SH-60K विमाने सामान्यतः पाणबुडीविरोधी ऑपरेशन्ससाठी विनाशकांवर तैनात केली जातात. जपानच्या NHK पब्लिक टेलिव्हिजनने सांगितले की, शनिवारच्या अपघाताच्या वेळी या भागात हवामानविषयक सूचना जारी करण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही. जानेवारी 2022 मध्ये, एअर सेल्फ-डिफेन्स एफ-15 फायटर जेट जपानच्या उत्तर-मध्य किनाऱ्यावर कोसळले होते. यात दोन क्रू कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. (Indian Embassy Issues Advisory: भारतीयांना दुबईचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला; UAE मधील भारतीय दूतावासाने जारी केली अॅडव्हाजरी)

प्रशिक्षणात फक्त जपानी नौदलाचा सहभाग -

किहारा यांनी सांगितलं की, सिकोर्स्कीने डिझाइन केलेले आणि सीहॉक नावाने ओळखले जाणारे ट्विन-इंजिन मल्टी-मिशन विमान रात्रीच्या वेळी पाणबुडीविरोधी प्रशिक्षणावर होते. शनिवारी रात्री 10:38 वाजता एकाचा संपर्क तुटला. सुमारे 25 मिनिटांनंतर दुसऱ्या विमानाशी संपर्क तुटला. प्रशिक्षणात फक्त जपानी नौदलाचा समावेश होता.