Somalia Bomb Attack: सोमालियाची (Somalia) राजधानी मोगादिशू (Mogadishu) येथे दोन बॉम्बस्फोट (Bomb Attack) झाले. या स्फोटात 100 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 लोक जखमी झाले आहेत. देशाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मदी यांनी रविवारी सकाळी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. शिक्षण मंत्रालयासह अनेक सरकारी कार्यालये असलेल्या परिसरात हे भीषण स्फोट झाले. हा परिसर खूप गजबजलेला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी झालेल्या स्फोटात लहान मुलांसह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. मोगादिशूमधील हल्ला अशा दिवशी घडला जेव्हा राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी हिंसक अतिरेक्यांना विरोध करण्यासाठी बैठक घेत होते. (हेही वाचा - South Korea: दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये भीषण दुर्घटना! हॅलोवीन फेस्टीव्हमध्ये चेंगराचेंगरीत १४९ जणांचा मृत्यू)
सोमालियाच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, पोलिस प्रवक्ते सादिक दोदिशे यांनी सांगितले की, दोन कार बॉम्बस्फोट झाले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारपर्यंत 30 मृतदेहांची मोजणी केली. अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गट अनेकदा राजधानी मोगादिशूला लक्ष्य करतो.
यापूर्वी 2017 मध्ये अल-शबाब गटाने मोठा स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये 500 हून अधिक लोक मारले गेले होते. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी या हल्ल्याला क्रूर आणि भ्याड असल्याचे सांगत अल-शबाब गटावर आरोप केले आहेत.
मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक -
मदिना हॉस्पिटलचे स्वयंसेवक हसन उस्मान म्हणाले, रुग्णालयात आणलेल्या किमान 30 मृत लोकांपैकी बहुतेक महिला आहेत. आमेन रुग्णवाहिका सेवेने सांगितले की त्यांनी किमान 35 जखमींना रुग्णालयात नेले आहे. हल्ला झाला तेव्हा 100 मीटर दूर असलेल्या अब्दिराजक हसन यांनी सांगितले की, पहिला स्फोट शिक्षण मंत्रालयाच्या परिमितीच्या भिंतीवर झाला, जिथे रस्त्यावर विक्रेते काम करतात. घटनास्थळी असलेल्या असोसिएटेड प्रेसच्या पत्रकाराने सांगितले की, दुसरा स्फोट एका व्यस्त रेस्टॉरंटसमोर दुपारी झाला.
स्फोटांमुळे अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आणि इतर वाहने उद्ध्वस्त झाली. सोमाली पत्रकारांच्या सिंडिकेटने आपल्या सहयोगी आणि पोलिसांचा हवाला देत सांगितले की, दुसऱ्या स्फोटात एक पत्रकार ठार झाला आणि इतर दोघे जखमी झाले.