'Sex at Work' Plan for Russians: रशिया-युक्रेन युद्धाला जवळजवळ दोन वर्षे होत आहेत. या दरम्यान रशियाने (Russia) आतापर्यंत युक्रेनच्या 18 टक्के भूभागावर कब्जा केल्याचे सांगितले जात आहे. हे युद्ध अजून किती काळ चालेल? रशियाचे लक्ष्य नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे कोणाला माहित असतेल तर ते आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin). आता व्लादिमीर पुतिन हे रशियातील घटत्या लोकसंख्येबद्दल खूप चिंतित आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्षांनी एक नवीन विचार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांनी रशियन नागरिकांना ऑफिसमध्ये लंच आणि कॉफी ब्रेक दरम्यान सेक्स करण्याचा सल्ला दिला आहे.
पुतीन यांची ही सूचना अशा वेळी आली आहे, जेव्हा रशियामध्ये प्रजनन दर प्रति महिला 1.5 वर आला आहे. रशियासाठीही ही चिंतेची बाब आहे, कारण एखाद्या देशाची लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी तिथल्या स्त्रियांचा जनन दर किमान 2.1 असायला हवा.
रशियाचे आरोग्य मंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव्ह यांनी रशियातील लोकांना त्यांच्या कुटुंबाचा विस्तार करण्यासाठी लंच आणि कॉफी ब्रेकचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की कामात खूप व्यस्त असणे हे लैंगिक संबंध न ठेवण्याचे वैध कारण नाही. हे एक निरुपयोगी निमित्त आहे. तुम्ही ब्रेक दरम्यान सेक्स करू शकता. कारण आयुष्य खूप वेगाने जाते. काही काळापूर्वी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी कुटुंबात आठ मुले जन्माला घालण्याचा सल्लाही दिला होता. रशियन लोकसंख्येचे संरक्षण हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय महत्त्वाचा विषय आहे, असेही पुतीन म्हणाले होते.
रशियातील चेल्याबिन्स्क भागातील अधिकाऱ्यांनी जन्मदर वाढवण्यासाठी आर्थिक मदतही सुरू केली आहे. येथे 24 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मावर 1.02 लाख रूबल (9.40 लाख रुपये) देय देण्याची ऑफर दिली जाते. रशियामध्ये गर्भपाताचा प्रवेश प्रतिबंधित आहे, तसेच सार्वजनिक व्यक्ती आणि धार्मिक नेते, स्त्रीची पहिली जबाबदारी मुले जन्माला घालणे आणि त्यांना वाढवणे आहे, याची वकिली करतात. रशियामध्ये घटस्फोटासाठी शुल्क देखील वाढविण्यात आले आहे. (हेही वाचा: Russia-Ukraine War Casualties: रशिया-युक्रेन युद्धात दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू; जखमींची गणतीच नाही)
या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार रशियाने 2024 च्या पहिल्या सहामाहीत 25 वर्षांतील सर्वात कमी जन्मदर नोंदवला आहे. जूनमध्ये जन्मदर प्रथमच एक लाखाच्या खाली आला आहे, जी मोठी घसरण असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. एएफपीनुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी जुलैमध्ये सांगितले की, जानेवारी ते जून 2024 दरम्यान रशियामध्ये एकूण 5,99,600 मुलांचा जन्म झाला, जो 2023 मधील याच कालावधीच्या तुलनेत 16 हजार कमी आहे.