सगळीकडे लग्न समारंभ सुरु असताना लग्नासंबंधीत नवनवीन गोष्टी समोर येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय. ज्यात वधू वर विमानात लग्न करतात. त्यानंतर पुन्हा एकदा लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुण मुलगी आणि तरुण मुलगा चक्क धावत्या ट्रेनमध्ये लग्न करतात. हा व्हिडिओ पश्चिम बंगाल येथील असल्याचे समजत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे तरुणाने तरुणीच्या डोक्यात कुंकु भरला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या गळात पुष्पहार माळ टाकली. उपस्थित प्रवाशांनी देखील या सोहळ्यात सहभाग दाखवला. एका युजर्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.