ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना कोरोना लागण झाली आहे. गोव्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चित्रिकरणाला असलेली परवानगी रद्द झाल्याने अग्गंबाई सुनबाईची टीम सध्या मुंबई मध्ये परतली आहे. मुंबई मध्ये मोहन जोशींची कोविड चाचणी झाल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे.