Zomato (PC - X/@deepigoyal)

Zomato Relaunches Intercity Legends Service: झोमॅटो (Zomato) फूड डिलिव्हरी कंपनीने आता लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याची सेवा सुरू केली आहे. झोमॅटोची ही सेवा 'इंटरसिटी लीजेंड्स' (Intercity Legends Service) या नावाने सुरू करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने यापूर्वी दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरूसाठीही अशीच एक्स्ट्रीम सेवा सुरू केली होती, जी आता बंद करण्यात आली आहे. झोमॅटोच्या या सेवेद्वारे वापरकर्ते त्यांचे आवडते खाद्यपदार्थ विशिष्ट रेस्टॉरंटमधून एका शहरातून दुसऱ्या शहरात ऑर्डर करू शकतात. हे पदार्थ दुसऱ्या दिवशी वितरित केले जातील.

झोमॅटोने 2022 मध्येच इंटरसिटी फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली असली तरी किमान ऑर्डरचे कोणतेही निश्चित मूल्य नव्हते. यावर्षी एप्रिलमध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती. आता ती नव्या नावाने आणि अटींसह सुरू करण्यात आली आहे. इंटरसिटी लिजेंड्स या नावाने सुरू झालेल्या या नव्या सेवेत लोकांना किमान 5 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ मागवावे लागणार आहेत. मात्र, Zomato ची ही सेवा सध्या फक्त निवडक शहरांमधील निवडक ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा -Zomato Receives GST Demand Notice: झोमॅटोला आयकर विभागाची नोटीस; 9.45 कोटी रुपये भरण्याचे दिले आदेश)

रिपोर्टनुसार, Zomato ची ही सेवा दिल्ली-NCR, बेंगळुरू, मुंबईसह काही मेट्रो शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. वापरकर्त्यांना झोमॅटो ॲपमध्येच इंटरसिटी लीजेंड्स नावाचा एक नवीन टॅब दिसेल, ज्याद्वारे वापरकर्ते विशिष्ट रेस्टॉरंटमधून एका शहरातून दुसऱ्या शहरात खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यास सक्षम असतील. (हेही वाचा -Zomato Payment: झोमॅटो कंपनीकडून पेमेंट एग्रीकेटर परवाना RBI ला परत, जाणून घ्या कारण)

या नवीन सेवेसाठी कंपनीने एक अट ठेवली आहे की येथे संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी ऑर्डर घेण्यात येईल. ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी वापरकर्त्यांना अन्न वितरित केले जाईल. अन्न खराब होणार नाही आणि त्याची चव अबाधित राहावी म्हणून अन्न डीप फ्रीझरमध्ये जतन करून ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाईल.