Zomato (PC - Facebook)

Zomato Receives GST Demand Notice: ऑनलाइन अन्न वितरण कंपनी झोमॅटो लिमिटेड (Zomato Limited) ला मोठा झटका बसला आहे. कंपनीला सहाय्यक व्यावसायिक कर आयुक्त (ऑडिट), कर्नाटक यांच्याकडून 9.45 कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा कर (GST) मागणी सूचना प्राप्त झाली आहे. कंपनीने बीएसई एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. कर्नाटकच्या कर नियामकाने 5,01,95,462 (5.01 कोटी) ची GST मागणी केली आहे. फाइलिंगनुसार, त्यावर 3.93 कोटी व्याज आकारले जाईल. तसेच 50.19 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यामुळे ही एकूण रक्कम 9.45 कोटी रुपये इतकी होईल. (हेही वाचा - Zomato Payment: झोमॅटो कंपनीकडून पेमेंट एग्रीकेटर परवाना RBI ला परत, जाणून घ्या कारण)

वृत्तानुसार, कंपनीने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, जीएसटी रिटर्न आणि अकाउंट्सच्या ऑडिट अंतर्गत कंपनीला आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर आदेश प्राप्त झाला आहे. Zomato चे शेअर्स शुक्रवार, 28 जून रोजी 200.35 रुपयांवर बंद झाले. कंपनी या आदेशाविरुद्ध योग्य प्राधिकरणासमोर अपील दाखल करेल. (हेही वाचा - Zomato GST Notice: झोमॅटो कंपनीला जीएसटीची नोटीस, 11.81 कोटी भरण्याचे आदेश)

यापूर्वीही प्राप्त झाल्या होत्या कर सूचना -

फूड डिलिव्हरी कंपनीला टॅक्स नोटीस मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. Zomato ला 2021 मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, गुरुग्रामच्या अतिरिक्त आयुक्तांकडून कर सूचना प्राप्त झाली होती. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोटीसमध्ये कंपनीने व्याज आणि दंडासह 11.82 कोटी भरण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंपनीनेही कर आदेशाविरोधात दाद मागण्याचा पवित्रा घेतला होता.