Zain Nadella | File Image

Microsoft चे CEO Satya Nadella यांच्या मुलाचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले आहे. मायक्रोसॉफ्ट कडून त्यांच्या कर्मचार्‍यांना एक इमेल द्वारा ही माहिती देण्यात आली आहे. Satya Nadella आणि त्यांची पत्नी अनू यांचा मुलगा Zain Nadella याने वयाच्या 26 व्या वर्षी सोमवार 28 फेब्रुवारी दिवशी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान तो cerebral palsy ने ग्रस्त होता. Zain Nadella चा जन्म Cerebral Palsy या आजाराने झाला होता.

सत्या नडेला यांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या CEO पदाची सूत्रं स्वीकराली आहेत. नडेला यांनी त्यांनंतर दिव्यांग वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी उत्पादने डिझाइन करण्यावर आपल्या कंपनीचे लक्ष केंद्रित केले. मुलगा झेनचे संगोपन करण्यासाठी त्यांनी शिकलेल्या धड्यांचा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी, Children’s Hospital मध्ये झेनचे बरेचसे उपचार झाले. नंतर Seattle Children’s Center for Integrative Brain Research च्या मदतीने नडेला यांनी Pediatric Neurosciences मध्ये झेन नडेला एंडॉव्ड चेअर (Zain Nadella Endowed Chair) बनवली होती. सत्या नडेला यांना यंदा भारताकडून दिल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारामध्ये 'पद्म भूषण' जाहीर झाला आहे. 

सेरेब्रल पाल्सी हा आजार लहान मुलांमध्ये जन्मतः आढळून येतो, याला मेंदुचा पक्षघात म्हणूनही ओळखलं जातं. या आजारात स्नायू काम्जोर असतात. शारिरीक क्रियांमध्ये समन्वय नसल्याने अनेक हालचालींवर बंधनं येतात. जगात दरवर्षी सुमारे 30,000 मुलांमागे 3 मुले या आजाराने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 6 ऑक्टोबर हा दिवस जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन (World Cerebral Palsy Day) पाळला जातो.