गुगलचे (Google) स्वामित्व असणारी व्हिडिओ स्ट्रिमिंग कंपनी युट्यूब (YouTube) मध्ये लवकरच नवे फिचर दाखल होणार आहे. यामुळे गुगलवर इच्छित व्हिडिओ शोधणे अधिक सोपे होईल. मुख्य उत्पादन अधिकारी नील मोहन यांनी सांगितले की, "प्रत्येक दिवशी लोक युट्युब वर नवनव्या विषयांवरील व्हिडिओज सर्च करत असतात. त्यांना इच्छित व्हिडिओ शोधणे सोपे व्हावे यासाठी मदत करण्याचे आम्ही नवनव्या पद्धती सादर करत आहोत."
स्थानिक भाषेत सर्च केल्यावर व्हिडिओज उपलब्ध न झाल्यास या फिचरमुळे कॅप्शन ऑटोमॅटीकली अनुवादीत होतील. तसंच यापूर्वी युट्युबवर व्हि़डिओ पाहण्यासाठी ब्राऊज केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची लघुप्रतिमा दिसेल. यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या स्नॅपशॉट काढता येईल. (YouTube द्वारे महिन्याला 7 लाख रुपयांपेक्षा अधिक कमावण्याची संधी; जाणून घ्या डिटेल्स)
होमपेजवरती तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ सर्चबारमध्ये टाईप करुन अगदी सहजरीत्या शोधू शकता. आता हा निर्णय घेण्यासाठी एक नवे फिचर युट्युबने लॉन्च केले आहे. यामध्ये होमपेजवरील व्हिडिओजच्या वेगवेगळ्या विषयांसंबंधित एक टाईमस्टॅम्प्ड व्हिडिओ तुम्हाला पाहिला मिळेल. जेणेकरुन त्या व्हिडिओमधील मजकूराबद्दल तुम्हाला निश्चित कल्पना येईल. यामुळे तुमच्या आवडीच्या विषयांसंबंधितचे व्हिडिओज अगदी सहजरित्या पाहू शकता. (Gmail, YouTube, Drive आणि Google App 27 सप्टेंबरपासून 'या' अॅनरॉईड फोन्सवर नाही चालणार; जाणून घ्या कारण)
डेक्सटॉपवरील युट्युबवर तुम्ही आधीपासूनच व्हिडिओज स्कोल करुन त्याच्या स्नीपेट बघू शकता. वेगवेगळ्या व्हिडिओज पैकी तुमचे आवडीचे व्हिडिओज मोबाईलवर सहजरित्या पाहता यावे, यासाठी हे फिचर तुम्हाला नक्कीच मदत करेल. दरम्यान, युट्युब हे प्रचंड लोकप्रिय अॅप त्याकडे उत्पन्नाचे साधन म्हणूनही पाहिले जाते.