Gmail, YouTube, Drive आणि Google App 27 सप्टेंबरपासून 'या' अॅनरॉईड फोन्सवर नाही चालणार; जाणून घ्या कारण
Google (Photo Credits: Google)

युट्युब (YouTube), जीमेल (Gmail) आणि जी ड्राईव्ह (G Drive) सारखे गुगल अॅप्स (Google Apps) आता जुनी अॅनरॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर असणाऱ्या मोबाईल्सवर चालणार नाहीत. हा बदल 27 सप्टेंबर 2021 पासून लागू होईल, असा ईमेल गुगलने आपल्या सर्व युजर्संना पाठवला आहे. या मेलमधील कन्टेंटनुसार, अॅनरॉईड व्हर्जन 3.0 पेक्षा कमी ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या डिव्हाईसेसवर गुगलचे हे अॅप्स चालणार नाहीत. त्यामुळे याची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. युजर डेटाचे प्रोटेक्शन आणि त्यांच्या अकाऊंट्सची सिक्युरीटी राखण्यासाठी गुगलने हा निर्णय घेतल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

अॅनरॉईड व्हर्जन 2.3.7 किंवा कमी ऑपरेटिंक सिस्टम असणाऱ्या युजर्संच्या मोबाईलवर 'username' किंवा 'password error' असा error दिसेल. हे युजर्स युट्युब, जीमेल, ड्राईव्ह यांसारख्या अॅप्समध्ये लॉग इन करु शकणार नाहीत. जरी या युजर्सनी नवीन गुगल अकाऊंट ओपन केले तरी त्यांना सारखाचा error येईल. ज्या युजर्सच्या मोबाईलमध्ये 2.3.7 ऑपरेटिंग सिस्टम आहे, असे युजर्स आपल्या मोबाईलच्या ब्राऊजरचा वापर करुन आपल्या अकाऊंट्समध्ये लॉन इन करु शकतात. परंतु, मोबाईल इन्स्टॉल असलेल्या गुगल अॅप्सवर त्यांना लॉग इन करता येणार नाही. (YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेट असूनही Slow Play होतात, करा 'हे' सोप्पे काम)

Google Mail (Photo Credits: 9To5Google)

युजर्सने जरी आपल्या मोबाईलमध्ये रिसेट फॅक्टरी हा पर्याय निवडला आणि पुन्हा लॉग इन केले तरी त्यांना तोच error दिसेल. अकाऊंट मोबाईलमधून काढून टाकले तरी वारंवार हा error पाहायला मिळेल. यासाठी मोबाईल अपग्रेड करुन अॅनरॉईड 2.3.7 पेक्षा नवीन ऑपरेटिंग सिस्टम वापरणे हा एकमेव पर्याय युजरकडे उरेल.