PUBG ला टक्कर देण्यासाठी Xiomi ने आणला Survival Game
Survival Game (Photo Credits- Facebook)

सध्या मोबाईल गेमिंगच्या चढाओढीत पबजी (PUBG) सर्वात लोकप्रिय ठरला आहे. तसेच पबजी खेळणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आता पबजीला टक्कर देण्यासाठी शओमी कंपनीने  Survival Game गेम युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

शाओमी या कंपनीने आणलेल्या Survival Game हा पबजीसारखाच आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये तुम्हाला जर हा गेम खेळायचा असेल तर 185MB स्टोरेज असणे गरजेचे आहे. या गेमला MI कंपनीने अॅप स्टोरवर उपलब्ध करुन दिला आहे. तसेच गेमच्या Beta वर्जनला विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पबजी सारखाच हा एक Battelfeild Game आहे. गेममध्ये एकमेकांना मारुन शेवट पर्यंत जीवंत राहणे आवश्यक आहे. इंडियन मार्केटने या गेमची प्रतिकृती बनविली आहे.

गेमच्या बाबतीत बोलायचे झाले तर, हा खेळ पॅराशूट मॅप स्थळाच्या येथे असणाऱ्या प्लेअरपासून सुरुवात होते. त्यानंतर एकमेकांना मारुन टाकत शेवटपर्यंत जीवंत राहणारा Survive Winner ठरणार आहे.