चीनची (China) अग्रेसर टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी (Xiaomi) रोज नवनवीन उत्पादनाच्या सहित बाजारात आपले स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच, आता शाओमीनं आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखा आणि काहीसा हटके कप आणला आहे. वायरलेस चार्जिंग (Wireless Charging) तंत्रज्ञानाचा हा कप चहा गरम ठेवण्याबरोबरच मोबाइल चार्जिंगची सुद्धा सुविधा पुरवणार आहे. या उत्पादनाचे नाव 'वॉर्म कप' (Warm Cup) असे आहे. कोणत्याही वातावरणात 55 डिग्रीपर्यंत तापमान राखण्याची या कपची क्षमता आहे. Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात धडकणार; मोबाईलमध्ये असणार 5 पॉप-अप कॅमेरे
शाओमीच्या या वायरलेस चार्जिंग कपद्वारे ग्राहकांना चहा किंवा कॉफी गरम ठेवण्यासोबतच सिफॉनच्या चार्जिंगचा सुद्धा पर्याय मिळणार असल्याने सध्या टेक विश्वात या उत्पादनाची बरीच चर्चा आहे. 'वॉर्म कप' हा प्रत्येकाच्या घरात असलेल्या रेग्युलर कपासारखाच असून यात काही खास फीचर्स आहेत. वॉटरप्रूफ बॉडी असल्याने खराब झाल्यानंतर हा कपस्वच्छ करता येतो. यामध्ये चार तास वापर न केल्यास याचं तापमान वाढण्याची प्रक्रिया आपोआप बंद होते आणि कप 'ऑटो स्लीप मोड' मध्ये जातो.
अबब! रशियन कंपनीने बाजारात आणले तब्बल 48 लाखांचे Apple AirPods; जाणून घ्या काय आहे खास
शाओमीच्या या 'वॉर्म कप'ची खासीयत म्हणजे चहा किंवा कॉफी गरम ठेवण्याबरोबरच हा कप फोन चार्ज करण्यासाठी सुद्धा वापरता येणार आहे. या कामासाठी क्पसोबत येणाऱ्या चार्जिंग पॅडचा वापर करावा लागतो. हा पॅड 10 वॅटचा असून, तुमच्या फोनमध्ये असणाऱ्या वायरलेस चार्जिंग फिचर ने या प्रकारची चार्जिंग करता येते. तूर्तास हा 'वॉर्म कप' केवळ चीनच्या बाजारात उपलब्ध असून याची किंमत 2 हजार रुपये आहे. मात्र भारतात हा कप नेमका कधी येणार याबाबत काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.