यूएई (United Arab Emirates) ची टेलिकम्युनिकेशन कंपनी थुराया (Thuraya) ने जगातील पहिला सॅटेलाइट स्मार्टफोन लाँच केला आहे. Thuraya X5-Touch असे या फोनचे नाव असून, अँड्राईडचे सर्व फीचर्स या समाविष्ट केले गेले आहेत. या फोनचे विशिष्ट म्हणजे हा फोन चक्क सॅटेलाइटशी कनेक्टेड राहणार आहे.
सॅटेलाइट फोन हा लँडलाइन किंवा सेल्युलर टॉवर नाही तर, थेट सॅटेलाइटकडून से सिग्नल घेतो. या सॅटेलाइट फोनचा फायदा हा आहे की, तुम्ही या फोनवरून जगातील कोणत्याही स्थानावरून कॉल करू शकता. वाळवंट असो वा कोणता पहाड, जंगल असो वा पाणी कुठेही हा फोन सिग्नल पकडू शकतो. या फोनमधील एक सिम 2जी/3जी/4जी नेटवर्कवर चालेल तर दुसरे सिम सॅटेलाइट नेटवर्कशी कनेक्ट असेल. कंपनीकडून हा फोन जगातील 160 देशांमध्ये सादर केला जाणार आहे.
वैशिष्ट्य -
> या फोनचा 5.2 इंच आयपीएस डिस्प्ले आहे, तर हा फोन अँड्राईड 7.1 नगेटवर चालेल.
> सॅटेलाइट फोन असल्याने याचे वजन 262 ग्रॅम इतके आहे. हा फोन वॉटरप्रुफ आणि डस्टप्रुफ असल्याने तुम्ही तो कुठेही आणि कोणत्याही हवामानात वापरू शकाल.
> Qualcomm Snapdragon 625 हा या फोनचा प्रोसेसर आहे. या फोनची रॅम 2 जीबी तर 16 जीबी मेमरी आहे.
> या फोनमध्ये 8 एमपी रिअर तर 2 एमपी फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनची बॅटरी 3800mAh इतकी आहे.
या फोनची किंमत 999 इयुआर म्हणजे 81 हजार रुपये असून, डिसेंबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.