
काही महिन्यांपूर्वी विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपवने या वर्षाच्या अखेरपर्यंत बंद होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा युजर्सला व्हॉट्सअॅपने एक धक्का दिला आहे. तर पुढील वर्षात (2020) मध्ये या स्मार्टफोन व्हॉट्सअॅप सुरु राहणार नसल्याचे सांगितले आहे.
व्हॉट्सअॅपने FAQ मध्ये स्पष्ट केले आहे की, Android 2.3.7 या स्मार्टफोनसह iOS 7 वर्जनमधील सर्व आयफोनमध्ये 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्याचसोबत या स्मार्टफोनच्या युजर्सला व्हॉट्सअॅप अकाउंट पुन्हा सुरु करता येणार नाही. तसेच यापूर्वी असलेले अकाउंट वेरिफायसुद्धा करता येणार नाही आहे.(हेही वाचा-पाकिस्तान मधून WhatsApp वर येणाऱ्या 'या' क्रमांकावरील फोन उचलू नका, नाहीतर व्हाल कंगाल)
मात्र iOS8 किंवा त्यानंतरच्या वर्जनमधील स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु राहणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने युजर्सला अॅंन्ड्रॉइड 4.0.3 किंवा त्याच्यानंतरचे स्मार्टफोन वापरण्याचे आवाहन केले आहे.