सोशल मीडियातील इन्संटंट टेस्कटिंग अॅप व्हॉट्सअॅपचे नवे बीटा वर्जन आले आहे. त्यामुळे युजर्सला लवकरच लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या माध्यमातून WhatsApp च्या द्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपकडून बीटा युजर्ससाठी नवे 2.2043.7 अपडेट जारी केले आहे. जे व्हॉट्सअॅप वेब वर्जनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगला सपोर्ट करणार आहे. हे नवे अपडेट सध्याच्या काळात Under Development मध्ये आहे. मात्र लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच येत आहे अॅनिमेटेड 'Baby Shark' स्टिकर फिचर्स; जाणून घ्या 'कसा' करता येणार वापर)
WhatsApp च्या लेटेस्ट बीटा अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या Webetainfo ने नव्या अपडेटचा एक स्क्रिनशॉट सुद्धा शेअर केला आहे. त्यांच्या या रिपोर्टनुसार, युजर WhatsApp Web च्या माध्यमातून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग उचलल्यास एक नवी विंडो सुरु होणार असून तेथे फोन उचलता किंवा कट करता येणार आहे. जेव्हा युजर व्हॉट्सअॅप वेबच्या माध्यमातून दुसऱ्या युजर्सला फोन करायचा असेल तर एक लहान विंडो सुरु होईल. यामध्ये कॉलचे स्टेटस सुद्धा सामील असणार आहे. व्हॉट्सअॅप वेबवर व्यक्तिगत कॉलिंग व्यतिरिक्त ग्रुप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे सुद्धा सपोर्ट मिळणार आहे. हे फिचर सध्या बीटा अपडेटवर उपलब्ध नाही आहे.(WhatsApp Always Mute Feature: व्हॉट्सअॅपच्या अनावश्यक नोटिफिकेशनला मिळणार कायमची सुट्टी; 'हे' फिचर्स ठरणार उपयुक्त)
📞 WhatsApp Web 2.2043.7: what’s new?
• More details and screenshots for Voice and Video Calls, from WhatsApp Web!
• WhatsApp has also added a "BETA" label, suggesting to offer Calls from WhatsApp Web soon!https://t.co/kkk9Oq5Mqx
NOTE: This feature will be enabled soon.
— WABetaInfo (@WABetaInfo) October 19, 2020
WhatsApp Web वर्जन मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट मिळल्यानंतर त्यांची काही कामे सोप्पी होणार आहेत. या अपडेट बद्दल गेल्या काही महिन्यांपासून मागणी केली जात होती. नव्या अपडेटमुळे पर्सनल कंप्युटर किंवा लॅपटॉपवर काम करण्या युजर्ससाठी WhatsApp कॉलिंग करण्यासाठी फोनची गरज भासणार नाही आहे. यामुळे युजर्सला काम करणे अगदी सोप्पे ही होणार आहे.