व्हॉट्सअॅप (WhatsApp) कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी (WhatsApp User) नवनवीन फिचर लॉंच (WhatsApp Feature Launch) करताना दिसतो. पण यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी (WhatsApp Group) एक नवा भन्नाट फिचर घेवून आला आहे. ज्यामुळे फक्त एका क्लीकवर तुम्हाला कुठलाही ग्रुप सहज शोधण शक्य होणार आहे. तुमच्या व्हॉट्सअॅपवर तुम्ही विविध ग्रुपला अॅड (WhatsApp Group Add) असता त्याचप्रमाणे अनेक कॉन्टॅक्टस (Contacts) तुमच्या फोनमध्ये सेव्ह असतात. त्यामुळे कधी तुम्हाला कुठल्या विशिष्ट ग्रुपवर मेसेज (WhatsApp Group Message) करायचा असल्यास तुम्हाला तो ग्रुप एवढ्या सगळ्या चॅटमध्ये स्क्रोल (Chat Scroll) करुन शोधावा लागतो. पण आता तुमच्या शेकडो चॅटच्या पसऱ्यातून तुम्हाला फक्त एक निवडक ग्रुप फक्त एका क्लीकवर शोधता येईल असा नवीन अपडेट व्हॉट्स अप आपल्या वापरकर्त्यांसाठी घेवून येणार आहे.
तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप चॅटमधून (WhatsApp Chat) एक विशिष्ट ग्रुप शोधायचा असल्यास वरती सर्च ऑप्शनमध्ये (Option) तुमच्या त्या ग्रुपमधल्या कुठल्याही एका मेंबरचं (WhatsApp Member) नाव टाईप (Type) करा. तोच लगेच तुमच्या चॅट बॉक्समध्ये (Chat Box) तुम्ही शोधत असलेला चॅट पुढे येईल. यामुळे तुमचा स्क्रोल (Scroll) करायचा वेळ वाचणार असुन तुम्हाला हवा तो ग्रुप अगदी काही मिनिटांत शोधण शक्य होणार आहे. (हे ही वाचा:- Twitter Gold Tick: आता ट्विटरवर दिसणार रंगबेरंगी टिक; जाणून घ्या गोल्ड, ग्रे आणि ब्लू टिक कोणाला?)
तसेच या फिचरनुसार तुम्ही कुठल्याही एका कॉन्टॅक्टचं नाव टाईप केल्यास तुम्हाला तो कॉन्टॅक आणि तुम्ही कुठल्या कुठल्या ग्रुपमध्ये एकत्रितपणे अड आहात हे कळणार आहे. बहुदा आपला एक कॉन्टॅक्ट आपल्या अनेक ग्रुपमध्ये सामिल असतो आणि आपल्याला त्याबाबत माहितीचं नसते पण आता तुम्ही कुठल्याही कॉन्टॅक्टला सर्च बॉक्समध्ये सर्च केल्यास तो कॉन्टॅक्ट तुमच्या कुठल्या कुठल्या ग्रुपमध्ये अड आहे हे सहज कळणार आहे.