प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

ट्विटर रोज नवा काय, कधी, कोणता अपडेट घेवून येईल ह्याचा काही नेम नाही. ट्विटर आता एक नवा फिचर घेवून आला आहे. काल पासून ट्विटर सबस्क्रीपशन चार्जेस आकारण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे व्हेरीफाईट अकाउंट असणाऱ्यांना आता पैसे मोजावे लागणार आहे. पण आता व्हेरिफाइड अकाउंट म्हणजे काय तर जुन्या ट्विटरच्या नियमांनुसार ज्या ट्विटर अकाउंटला ब्लू टिक आहे त्या अकाउंटला व्हेरिफाइड अकाउंट म्हणायचे. म्हणजेचं मोठं मोठी सरकारी, कार्यालय, उद्योगपती, राजकारणी, पत्रकार, संस्थान यांना ही ब्लू टिक मिळायची. तर याच सगळ्या ब्लू टिक असणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांना ट्विटर वापरासाठी पैसे मोजावे लागणार आहे. पण याउलट हे ट्विटर सबस्क्रीपश कुणीही घेवू शकतं. म्हणजेच सर्वसामान्यांना देखील आता आपल्या अकाउंटवर ब्लू टीक मिळवता येणार आहे. म्हणजे तुम्ही ट्विटर सबस्क्राईब केलं की तुम्हालाही लगेचं ब्लू टीक मिळेल त्यासाठी तुम्हाला कुणी बडा किंवा सुप्रसिध्द व्यक्ती असण्याची गरज नाही.

 

पण केवळ पैसे देवून अशी ब्लू टिक सहज कुणालाही मिळत असल्याने नेमक व्हेरिफाईड अकाउंट कुठलं हे ओळखण अवघड झालं आहे. यासाठीचं ट्विटर कडून दोन नव्या टिक लॉचं करण्यात आल्या आहेत. ग्रे टिक आणि सोनेरी टिक. तर या तीन वेगवेगळ्या टिक वेगवेगळ्या ट्विटर वापरकर्त्यांना देवू करण्यात येणार आहे. ज्यामुळे व्हे रिफाइड अकाउंट ओळखण सहज शक्य होणार आहे. (हे ही वाचा:- Twitter Subscription: आजपासून ट्विटर वापरासाठी मोजावे लागणार पैसे, ट्विटर सबस्क्राईब चार्ज आकारण्यास आजपासून सुरुवात)

 

 

ट्विटरच्या या नव्या अपडेटनुसार ट्विटर कडून कंपन्यांच्या व्हेरिफाइड अकाऊंटला गोल्डन टिक देण्यात आली आहे तर सरकारच्या व्हेरिफाइड अकाऊंटला टिक ग्रे असणार आहे. तसेच ट्विटर सबस्क्रिपशन धारकांना ब्लू टिक दिल्या जाणार आहे. सर्वसामान्यांपासून ते  सेलिब्रेटीपर्यत जो कुणी ट्विटरला सबस्क्राईब करेल त्या प्रत्येक ट्विटर अकाउंटला ब्लू टिक ट्विटरकडून ब्लू टिक दिल्या जाईल.