व्हॉट्सअॅप (WhatsApp) आज केवळ मेसेजिंगसाठीच नाही तर व्हिडीओ कॉलिंगसाठीही वापरला जातो. इतकाच नाही तर यूजर्सच्या सुविधेसाठी व्हॉट्सअॅपवर नवीन फीचर्सचा समावेश करत आहे. तसेच कंपनी अद्याप बऱ्याच फीचर्सवर काम करत आहे ज्या येत्या काळात उपलब्ध होईल आणि यूजर्ससाठी त्या खूप उपयुक्तही ठरतील. फेसबुक-च्या मालकीची मेसेजिंग सेवा व्हॉट्सअॅप यूजर्सना एखाद्या व्यक्तीला न कळू देता त्याचा स्टेट्स (Status) पाहण्याचीही संधी देते. 2 वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपने यूजर्ससाठी 'स्टेटस' फीचर्स लाँच केला होता. यावेळी यूजर्सना फक्त टेक्स्ट मेसेज, स्टेटस म्हणून ठेवण्याची सोया होती. या फीचर्समध्ये नंतर बदल केला गेला ज्यामुळे व्हॉट्सअॅप यूजर्सना त्यांच्या मित्र आणि संपर्कांसह फोटोज आणि व्हिडिओ सहजपणे आणि सुरक्षित मार्गाने शेअर करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. पण, लोकांना एखाद्याचा व्हॉट्सअॅप स्टेटस बघायची इच्छा असते पण त्यांना ते जाणून घ्यायचे नसते. आणि यूजर्स ते करू शकतात फक्त एक सोप्पी ट्रिक वापरून. (WhatsApp ने युजर्ससाठी लॉन्च केले भन्नाट फिचर, QR कोडच्या माध्यमातून नवे क्रमांक अॅड करता येणार)
व्हॉट्सअॅपचे स्टेटस फिचर यूजर्समध्ये फार प्रसिद्ध आहे. पण, जेव्हा आपण एखाद्याचा स्टेटस पाहतो तेव्हा यूजरला त्याबद्दल माहिती मिळते. जर एखादा यूजर दुसर्या व्यक्तीला हे कळू देऊ नये की त्याने किंवा तिने स्टेटस पाहिला आहे तर त्यास पर्याय आहे. मेसेंजरच्या 'Read receipt' या फीचरद्वारे ही युक्ती वापरली जाऊ शकते. या रिसीट आपल्याकडे पाठविलेल्या प्रत्येक संदेशाच्या पुढे दिसणारी टिकचिन्हे आहेत. जर 'Read receipt' फिचर अक्षम केले तर आपल्याला मेसेजच्या पुढे दुहेरी टिक दिसेल म्हणजे आपला मेसेज पाठविला गेला परंतु वाचला गेलेला नाही.
एकच टिक म्हणजे संदेश वितरित झाला नाही. आता, आपण एखाद्याचा व्हॉट्सअॅप स्टेटस त्याला न काळात वाचायचा असल्यास 'Read receipt' वैशिष्ट्य अक्षम करणं आवश्यक आहे. एकदा Read receipts बंद केली की आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला आपण त्याचा किंवा तिचा स्टेटस पाहिल्याचे आढळणार नाही. तथापि, याचा अर्थ असा आहे की आपण आपला 'स्टेटस' पाहिलेल्या लोकांची नावे पाहण्यात सक्षम होणार नाही.