व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅपपैकी एक आहे. आबालवृद्धांना आता त्याची सवय झाली आहे. पण आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी काही जुन्या मोबाईल मॉडेल्ससोबत त्याची सेवा संपणार आहे. सध्या केवळ मेसिजिंग साठी नव्हे तर बिझनेससाठी देखील व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. जगभरात लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी इंटरनेटच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरलं जाऊ शकतं. पण व्हॉट्सअॅपने दिलेल्या यादीनुसार आजपासून ही सुविधा काही स्मार्टफोन्समध्ये बंद होत आहे. WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत.
व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आयफोनमध्ये कमीत कमी आयओएस 9 किंवा त्यापेक्षा नवं व्हर्जन असणं गरजेचे आहे. तर अॅन्ड्रऑईड स्मार्टफोन्समध्ये कमीत कमी अॅन्ड्रॉईड 40.3 किंवा त्यापेक्षा अधिकचं व्हर्जन आवश्यक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये यापेक्षा जुनी ऑपरेटींग सिस्टीम असल्यास आता तुम्ही व्हॉट्सअॅप मोबाईल अॅपचा वापर करू शकणार नाही. दरम्यान व्हॉट्सअॅप मोबाईल अॅपमध्ये वारंवार बदल करत असतात. अॅपमध्ये नवीन अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅच दिले जातात. अशामध्ये जुन्या व्हर्जनच्या ऑफ्टवेअरमध्ये सपोर्ट कमी केला जातो.
कोणत्या फोनमधून आता व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार?
आईफोन 4एस, आईफोन 5, आईफोन 5एस, आईफोन 6 और आईफोन 6एस हे आयफोन मॉडेल आहेत तर एचटीसी डिजायर (HTC Desire), मोटोरोला ड्रॉयड रेजर (Motorola Dryer Razor), एलजी ऑप्टिमस ब्लैक (LG Optimus Black) और सैमसंग (Samsung) गैलेक्सी एस 2 या अॅन्ड्रॉईड फोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होईल.
मोबाईल युजर्सना मोबाईल मध्ये नेमकी कोणती ऑपरेटिंग सिस्टिम आहे हे ठाऊक नसल्यास ते सहज सेटिंगमध्ये जाऊन ते तपासून पाहू शकतात. आयफोन युजर्सना हा पर्याय सेटिंगमध्ये जनरल पुढे इन्फॉरमेशनमध्ये पहायला मिळेल तर अॅन्ड्रॉईड युजर्स ही माहिती सेटिंगमध्ये जाऊन अबाऊट फोनमध्ये पाहू शकतात.