विंडोज स्मार्टफोनमध्ये WhatsApp आता 31 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)  आपल्या युजर्ससाठी प्रत्येकवेळी नवीन फिचर्स घेऊन येत असते. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप साठी सपोर्ट सेवा सुद्धा काही विडोंज स्मार्टफोनसाठी बंद करण्यात आली होती. त्याचसोबत विंडोज 8.1 आणि 10 वर्जन असेल्या स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅप  सपोर्ट देण्यात आलेला होता. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप  सर्व विंडोज स्मार्टफोनमध्ये 31 डिसेंबर पर्यंत सपोर्ट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु 1 जानेवारी 2020 पासून विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप  सपोर्ट करणार नाही आहे. त्याचसोबत अँन्ड्रॉईड युजर्स व्हर्जन 2.3.7 आणि अगोदरचे व्हॉट्सअ‍ॅप  व्हर्जन, आयफोन आयोएस 7 आणि अगोदरचे व्हर्जन यामध्ये सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप  1 जानेवारी,2020 पासून सपोर्ट करणार नाही आहे. यापूर्वी विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप 7 डिसेंबर 2016 पासून बंद झाले होते.(एप्रिल महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनमध्ये फेसबुक चालणार नाही)

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या वर्षाअखेर पर्यंत व्हॉट्सअ‍ॅप विंडोज स्मार्टफोनसोबत काम करणार आहे. तर जून महिन्यात विंडोजसाठी शेवटचे अपटेड युजर्सला मिळणार आहे. तसेच फेसबुकने विकत घेतलेल्या युडब्लूपी (UWP) अ‍ॅप हे सध्या सर्व विंडोज स्मार्टफोनआणि विंडोज डेस्कटॉप मध्ये सपोर्ट करणार आहे.