एप्रिल महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनमध्ये फेसबुक चालणार नाही
Facebook (Photo Credits-Twitter)

फेसबुक (Facebook) येत्या एप्रिल महिन्यानंतर काही स्मार्टफोनमध्ये त्यांचे फेसबुक अॅपसह अन्य अॅपसाठी देण्यात आलेली सपोर्ट सिस्टिम काढून घेणार आहे. तर काही विंडोज फोनमध्ये (Windos Smartphones) फेसबुक आणि अन्य अॅप चालणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. त्याचसोबत फेसबुकने या महिन्याच्या शेवटपर्यंत विंडोज स्मार्टफोनसाठी फेसबुक, इंन्स्टाग्राम आणि मेसेंजरची सेवा बंद होणार आहे. त्यामुळे विडोंज युजर्स थर्ड पार्टी अॅप आणि मोबाईलच्या वर्जननुसार या सर्व सेवा सुरु ठेवू शकणार आहेत.

तसेच यापूर्वी व्हॉट्सअॅपसाठी सपोर्ट सेवा सुद्धा काही विडोंज स्मार्टफोनसाठी बंद करण्यात आली आहे. तर विंडोज 8.1 आणि 10 वर्जन असेल्या स्मार्टफोनसाठी व्हॉट्सॅप सपोर्ट देण्यात आलेला आहे. तसेच गुगल कंपनीने त्यांची गुगल प्लस सेवा बंद केली आहे. यापूर्वी कंपनीने इनबॉक्स आणि यल्लो अॅपसुद्धा बंद केले. त्यामुळे येत्या 30 एप्रिल नंतर फेसबुक त्यांचे 3 अॅप बंद करणार आहेत.(हेही वाचा-भारतात TikTok बंद होण्याची शक्यात, मद्रास उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश)

तर मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 स्मार्टफोनमध्ये वर्षाच्या अखेरपर्यंत फेसबुक सपोर्टची सेवा बंद होणार आहे. विडोंज स्मार्टफोनसाठी काही अॅपने त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत.