WhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) आजकाल रोज एक नव्या फीचरबद्दल अपडेट मिळत आहे. यामध्ये आता इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्येही स्टिकर्सचा पर्याय खुला केला जाणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, Android, iOS आणि Web Updates वर लवकरच हा पर्याय खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्टिकर्स पॅकमध्येच तुम्हांला अ‍ॅनिमेटेड स्टिकर्सदेखील पाहता येणार आहेत. स्टिकर्स सेन्ड करण्यापूर्वी तुम्हांला त्याचा प्रिव्ह्यू पाहता येणार आहे. सध्या बीटा व्हर्जनवर त्याच टेस्टिंग सुरू असून लवकरच ते रोल आऊट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या 5 महिन्यांत सुरु होणार Whatsapp Pay; आता पैसे पाठवणे होणार आणखी सोपे

via GIPHY

जिफ आणि अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स हे दोन वेगवेगळे पर्याय आहेत. जिफ केवळ विशिष्ट वेळेदरम्यान प्ले होते तर अ‍ॅनिमिटेड स्टिकर्समध्ये ते पुन्हा पुन्हा प्ले करण्याची गरज नाही.