WhatsApp सर्विस बंद होणार? कंपनीने दिले 'हे' उत्तर
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

WhatsApp कडून काही नवे आणि अॅडवान्स फिचरसह आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. अॅपचे अपकमिंग फिचर मल्टि-डिवाइस सपोर्ट लवकरच अॅपवर लॉन्च केले जाणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपप मल्टि डिवाइस फिचर बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अॅपचे सर्वाधिक युजफूल अपडेट पैकी एक आहे. मात्र कधी कोणी असा विचार केला आहे की, मल्टि डिवाइस सपोर्ट आल्यानंतर व्हॉट्सअॅप वेब काय असणार आहे आणि याचा वापर कसा करता येईल? ही सर्विस बंद करणार का? असे सर्व प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सअॅपच्या एका प्रवक्त्यांनी नुकत्याच Tech Radar वर दिले आहे.

WhatsApp मल्टि डिवाइस सपोर्ट युजर्सला व्हॉट्सअॅपचा वापर करण्याव्यतिरिक्त दुसऱ्या डिवाइसवर सुद्धा वापरण्याची परवानगी देते. भले त्यांचा फोन इंटरनेट नेटवर्क सोबत जोडला गेलेला नसेल. यापूर्वी युजर्सला व्हॉट्सअॅप वेब किंवा विडोज व MacOS अॅप पर्यंत पोहचण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागत होता. त्यानंतरच इंटनरेटच्या माध्यमातून फोन कनेक्ट केला जायचा. जेव्हा फोन नेटपासून डिस्कनेक्ट व्हायचा तेव्हा वेब किंवा डेस्कटॉप वर्जन सुद्धा मेसेज रिसिव्ह करणे बंद करतो. मात्र मल्टि-डिवाइस फिचरनंतर हे सर्व बदलले जाणार आहे.(Twitter वर लवकरच येणार 'हे' शानदार फिचर, युजर्सला मिळणार अकाउंट लॉक किंवा बंद झाल्याची माहिती)

मल्टि-डिवाइसच्या ऑप्शनसह प्रमुख डिवाइससह अधिकाधिक चार डिवाइस कनेक्ट करता येणार आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की, व्हॉट्सअॅप वेब जागतिक स्तकावर सुरु झाल्यानंतर बंद होणार का? याचे उत्तर देत असे सांगण्यात आले आहे की, आता सध्या व्हॉट्सअॅप सर्वांसाठी एक महत्वाचे प्लॅटफॉर्म बनले आहे. डेस्कटॉप आणि वेब सपोर्ट फक्त तुमचा फोनला मिरर प्रमाणे काम करतो. म्हणजेच तुमचा फोन सुरु असावा आणि एक अॅक्टिव्ह कनेक्शन असावे.

जर तुम्हाला अॅडिशन डिवाइसच्या रुपात एखाद्या दुसऱ्या स्मार्टफोन किंवा टॅबला जोडण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबावे लागणार आहे. जर तुम्ही आपल्या लॅपटॉप किंवा PC वर मेसेज पाठवणे पसंद करत असाल तर तसे होऊ शकते. जरी तुमचा स्मार्टफोन इंटरनेट सोबत कनेक्ट सुद्धा नसेल तरीही चालेल.