Twitter logo (Photo courtesy: Twitter)

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी नवेनवे फिचर्स घेऊन येतात. त्याचसोबत काही शानदार फिचरवर सुद्धा ट्विटरकडून काम केले जात आहे. यामध्ये एक नोटिस फिचर आहे. हे फिचर आल्यानंतर युजर्सला अकाउंट बंद किंवा लॉक झाल्याची माहिती मिळणार आहे. ज्यांनी ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या युजर्सला रीड-ओन्ली मोड मध्ये टाकले जाणार आहे.  ट्विटरचे प्रवक्ते यांनी असे म्हटले आहे की. आम्ही युजर्सच्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी एक नोटिस फिचरची टेस्टिंग सुरुवात करत आहोत. या टेस्टिंगमध्ये काही निवडक Android, iOS आणि वेब युजर्सचा समावेश असणार आहे. अशी अपेक्षा आहे की, लवकरच हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाईल.

ट्विटरने एका नोटिस फिचरमध्ये अशा युजर्ससाठी काही गाइडलाइन्स तयार केल्या आहेत ज्यांचे अकाउंट निलंबित किंवा लॉक आहे. जर तुमचे अकाउंट कायमचे निलबंति होऊ शकते. तसेच तुम्हाला अपील करु शकता. तर दुसऱ्या बाजूला अकाउंट लॉक असेल तर एका आठवड्याच्ानंतर ते अनलॉक होणार आहे. (काय सांगता? आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material)

माहितीसाठी लक्षात असू द्या की, ट्विटर पुढील आठवड्यात आपले खास फ्लिट फिचर बंद करणार आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, हे फिचर युजर्सला आकर्षित करण्यास अयशस्वी ठरले आहे. याच कारणामुळे फ्लिट फिचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्हाला दु:ख होत आहे.

कंपनीने जून 2020 मध्ये फ्लिट फिचरची टेस्टिंग भारत, दक्षिण कोरिया, इटली  आणि ब्राजील मध्ये सुरु केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये फिचर लॉन्च करण्यात आले होते. फ्लिट फिचर बद्दल बोलायचे झाल्यास याअंतर्गत फोटो आणि अन्य मेसेज फक्त 24 तासांसाठी उपलब्ध करुन दिला जात होता. त्यानंतर तो फोटो किंवा मेसेज आपोआप गायब व्हायचा.