फोटो सौजन्य- Digital Trends

व्हॉट्सअ‍ॅप नेहमी त्यांच्या यूजर्ससाठी नवं नवे फीचर्स घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. त्यात आता अजून तीन नव्या फीचर्सची लवकरच भर पडणार आहे. नवीन अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅपटच्या तीन नव्या फीचर्समध्ये ग्रुप चॅटिंग, प्रायव्हेट रिप्लाय आणि फोटो/ व्हिडिओ एडिट करताना स्माईली टच देता येणार आहे. त्याचबरोबर स्टिकर्स आणि स्टेटस टॅबमध्ये देण्यात आलेल्या थ्रिडीटचच्या माध्यमातून कॉन्टॅक्समधून स्टेटस पाहता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर सध्या Apple iPhone यूजर्ससाठी दिले आहे. अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वर्जन 2.19.10 यासाठी हे तीन नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपच्या या तीन नव्या फीचर्स बद्दल.

प्रायव्हेट रिप्लाय

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर iOS यूजर्ससाठी प्रायव्हेट रिप्लायचे फीचर्स उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रुपमध्ये चॅटिंग करण्यासोबत तुम्ही प्रायव्हेट चॅट करु शकता. तसेच जो मॅसेज प्रायव्हेटमध्ये पोहचवायचा आहे त्यावर लॉन्ग प्रेस केल्यावर तेथे तीन डॉट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यानुसार तुम्ही प्रायव्हेट रिप्लायही करु शकता. सध्या आयफोनला हे फीचर्स देण्यात आलेले असून काही दिवसांनी अ‍ॅड्रॉईडसाठी हे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

फोटो/ व्हिडिओत स्टिकर्सचा उपयोग

iOs यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटेड फीचर्समध्ये फोटो किंवा व्हिडिओत स्टिकर्सचा उपयोग करता येणार आहे. या स्टिकरचा टॅब इमोजीच्या बाजूला देण्यात आला आहे.

स्टेटस प्रीव्हूसाठी थ्रिडीटच

थ्रिडीटच हे फीसर्च सध्या सगळ्या आयफोनमध्ये देण्यात येत आहे. तर 2015 मध्ये हे फीचर्स लॉन्च करण्यात आले होते. या फीचर्सचा उपयोग करण्यासठी यूजर्संना कॉन्टॅकद्वारे अपलोड करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीवर लॉन्ग प्रेसकरुन ठेवावे. त्यामुळे यूजर्संना ज्यांच्या कॉन्टॅकद्वारे अपलोड केलेली व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी पाहता येणार आहे.