WhatsApp (Photo Credits: Pixabay)

आधुनिक काळासोबत पुढे जात असताना आता अन्न, वस्त्र, निवारा यांसोबत इंटरनेट ही जणू काळाची गरज बनत चालली आहे असे म्हणायला हरकत नाही. इतकच नव्हे तर या इंटरनेट सोबत तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप असणेही तितकेच गरजेचे झाले आहे. या व्हॉट्सअॅपमध्ये दिवसेंदिवस काही ना अपडेट्स पाहायला मिळतातच. यात Whatapp चे ग्रुप फिचर हे जितक फायदेशीर आहे तितकेच ते डोकेदुखी बनत चालले आहे. कारण कोणीही कितीही ग्रुप बनवतो आणि आपल्याला अनपेक्षितपणे त्या ग्रुपमध्ये अॅड केले जाते. आणि मग सुरु होता सतत मेसेजेसचा भडिमार आणि खणान्-खणा वाजणारा फोन. हे सर्व खूपच त्रासदायक होते. म्हणूनच यापासून सुटका करुन घेण्यासाठी Whatsapp ने हे नवीन अपडेशन आणले आहे.

Group Privacy च्या या अपडेटमध्ये तुम्हाला कोणताही ग्रुप अॅडमिन तुमच्या परवानगी शिवाय कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीने तुमच्या व्हॉट्सॅप सेटिंगमध्ये बदल करावे लागतील.

1. व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये असलेल्या 'nobody', 'my Contacts' किंवा Everyone या पैकी कोणता तरी एक पर्याय निवडावा लागेल.

हेदेखील वाचा- WhatsApp वर लवकरच येणार एक नवं फिचर, 5 मिनिटांत गायब होणार मेसेज

2. Nobody हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणीही कोणत्या ग्रुप मध्ये Add करु शकणार नाही. आणि तसे करायचे असल्यास त्याला तुमची परवानगी घ्यावी लागेल.

3. My Contacts हा पर्याय निवडल्यानंतर त्या यूजरच्या कॉन्टेक्ट यादीत असलेल्या कोणत्याही नंबरला ते अॅड करु शकता.

4. तर Everyone हा पर्याय निवडल्यानंतर त्याला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केले जाऊ शकते.

5. यूजरला ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी एक मेसेज पाठवला जाईल, त्या नंतर यूजरला 3 दिवसाच्या त्याचा रिप्लाय द्यावा लागेल अन्यथा ते एक्सपायर होईल.

काही जणांना सोशल मिडियामुळे आपले खाजगी आयुष्य लोकांसमोर असे वाटत असते. त्यांच्यासाठी हा पर्याय खूप फायद्याचा ठरेल.