व्हाट्सअॅप (WhatsApp) यूजर्सची खासगी माहिती इंटरनेट सर्च इंजिनवर कथीत रुपात लिक झाल्याच्या वृत्तानंतर सोशल मीडिया आणि जगभरातील युजर्समध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर व्हाट्सअॅपकडून लागलीच स्पष्टीकरण ( WhatsApp Clarification) देण्यात आले आहे. फेसबुककडे मालकी हक्क असलेले सोशल मीडिया अॅप व्हाट्सअॅपने म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपकडून अलिकडेच बदललेल्या धोरणांनुसार युजर्सच्या मित्र, अथवा कुटुंबीयांशी शेअर केलेल्या खासगी माहितीवर (WhatsApp Privacy) त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. सर्व युजर्सची माहिती सुरक्षीत आहे.
व्हाट्सअॅप माहिती सुरक्षेबाबत व्हाट्सअॅपकडून गेल्या काही काळात आलेले हे दुसरे स्पष्टीकरण आहे. कंपनीने या आधी जाहीर केलेल्या धोरणानुसार व बदलानुसार केवळ बिजनेस अकाऊंटवर परिणाम होईलअसे म्हटले होते. WhatsApp ने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही काही अपवांचे खंडण करु इच्छीतो आणि 100% खात्रीपूर्वक सांगतो की, आम्ही आपल्या (युजर्स) कोणत्याही प्रकारच्या खासगी माहिती, संदेशाची एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरक्षा कायम ठेवत आहोत. कायम ठेऊ. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये अपडेटमुळे आपल्या अथवा आपल्या मित्र परीवार, कुटुंबीयांसोबत शेअर केलेल्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. (हेही वाचा, Mumbai Police On Elon Musk Tweet: एलन मस्क यांचे ट्विट मुंबई पोलिसांकडून मजेशीरपणे रिट्विट, म्हणाले 'सिग्नल वापरा पण रस्त्यावरचे')
We want to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption. pic.twitter.com/6qDnzQ98MP
— WhatsApp (@WhatsApp) January 12, 2021
सोशल मीडिया अॅप WhatsApp प्रायव्हसी पॉलिसीवरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. सर्च इंजिन गूगल (Google) वर पुन्हा एकदा व्हाट्सअॅपचे खासगी ग्रुप दिसू लागले आहेत. गूगलवर सर्च करुन कोणीही व्हाट्सअॅपचे कासगी ग्रुप शोधू शकतो. तसेच हे ग्रुप जॉईनही करु शकतो. ही समस्या पहिल्यांता 2019 मध्ये पुढे आली होती. दरम्यान, ही समस्या गेल्याच वर्षी दूर करण्यात आली होती. गूगलवर सर्च केल्यानंतर व्हाट्सअॅप यूजर्सची प्रोफाईल दिसत असे. त्यामुळे लोकांचे फोन नंबर आमि प्रोफाईल पिक्चर सामान्य गूगलसर्चवर उपलब्ध होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होते आहे.